Ajit Pawar : पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्यास…; पक्ष सोडण्याच्या चर्चांवर निलेश लंकेंना अजितदादांचा इशारा

Ajit Pawar : पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्यास…; पक्ष सोडण्याच्या चर्चांवर निलेश लंकेंना अजितदादांचा इशारा

Ajit Pawar on Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार ( Ajit Pawar ) गटाचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) हे खासदारकीसाठी उत्सुक आहेत. मात्र महायुतीमध्ये विखेंना उमेदवारी मिळाल्याने लंके हे लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या. लंके व शरद पवार यांची भेट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. त्यावर अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली तर निलेश लंकेला आमदारकी सोडावी लागेल. असं म्हणत लंके यांना थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्याने वेगळा निर्णय घेऊ नये असे माझी त्याला विनंती आणि आवाहन आहे. त्याची माझी कालच भेट झाली. मात्र तसा निर्णय घ्यायचा असेल तर त्याला आमदारकी सोडावी लागेल. नाहीतर तो अपात्र होईल. तसेच कायद्यानुसार अशा प्रकारे पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्यास पक्ष कारवाई करू शकतो. असा इशारा यावेळी अजित पवार यांनी निलेश लंके यांना दिला आहे.

राहुल गांधींचं जीव तोडून भाषण मात्र, पवार मोबाईलमध्ये व्यस्त; भाकरी फिरवण्याची चर्चा कुणाशी?

आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सुप्याच्या दिशेने सभेसाठी जात असताना रस्त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या कोविड काळातील कामाच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आज पुण्यामध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

Bharat Jodo Nyay Yatra : शेतकरी दुर्लक्षित अन् मोदी समुद्र, हवाई सफारीत व्यस्त; नाशिकमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

दरम्यान या दोनच आज निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे देखील चर्चा रंगत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने निलेश लंके हे नगर दक्षिणमधून लोकसभेची तुतारी फुंकणार का थोड्याच वेळा स्पष्ट होईल मात्र. निलेश लंके यांनी आपल्या मतदारसंघातून जी जोरदार तयारी चालवली आहे त्या अनुषंगाने निलेश लंके यांचा आज शरद पवार गटात प्रवेश हा निश्चित मानला जातो आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube