Nilesh Lanke : महानाट्याच्या माध्यमातून लोकसभेची पेरणी? लंकेंनी स्पष्ट बोलून दाखवलं
Nilesh Lanke : शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्याच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या रूपाने छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न आहे. या महानाट्याच्या आयोजनाच्या मागे कोणताही राजकीय संबंध नसल्याचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी ठामपणे सांगितले.
अनोखी भूमिका अन् जिवंतपणा, कसा आहे ‘अमलताश’? राहुल देशपांडे म्हणतात…
तसेच ते म्हणाले की, खा. अमोल कोल्हे व माझे मैत्रीचे संबंध आहेत. महानाट्याच्या आयोजनाबाबत वर्षभरापासून चर्चा सुरू होती. महानाट्याच्या खर्चाबाबत कोल्हे यांच्याशी चर्चा झालेली नाही. सेटअप, ध्वनीक्षेपन यंत्रणा त्यांचीच असून त्यांनी ती इकडे पाठविली असल्याचे आमदार लंके यांनी स्पष्ट केले.
तुलना कुणाशी करायची याचं भान ठेवा, अजित पवारांना जयंत पाटलांचा टोला
शुक्रवारी, दि.१ मार्चपासून शिवपुत्र संभाजी या महानाट्यास प्रारंभ होणार असून त्या पार्श्वभुमीवर आमदार लंके यांनी गुरूवारी कार्यक्रमस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार लंके म्हणाले की,सध्या विविध समाजात तेढ,वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. जातीयवाद केला जात आहे. चुकीच्या पध्दतीने समाजाला भरकटविले जात आहे. समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा तसेच शिवपुत्र संभाजीराजे महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये.
चांगले काम करणारांकडे लोक बोट दाखवितात
कोरोना काळात आम्ही कोव्हीड सेंटरचे काम केले. या कामाची चौकशी लावण्याचाही काही महाभागांनी प्रयत्न केला. आमचे काम पारदर्शी असल्याने त्यात काही निष्पन्न होण्याचा प्रश्नच नव्हता. चांगले काम करणारांकडे लोक बोट दाखवतात.त्याचा विचार न करता पुढे जायचे असते. एकदा ठेच लागल्यानंतर माणूस शहाणा होतो असे लंके म्हणाले.