Bharat Jodo Nyay Yatra : शेतकरी दुर्लक्षित अन् मोदी समुद्र, हवाई सफारीत व्यस्त; नाशिकमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

Bharat Jodo Nyay Yatra : शेतकरी दुर्लक्षित अन् मोदी समुद्र, हवाई सफारीत व्यस्त; नाशिकमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुका ( Loksabha Election ) जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो ( Bharat Jodo Nyay Yatra ) ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. यादरम्यान नाशिकमधील चांदवड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांसह शरद पवारांनी राहुल गांधी हे एकाच मंचावर होते. यावेळी राहुल गांधींनी आपल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या समुद्र आणि हवाई सफरी वरूनही टोला लगावला.

Neetu Chandra: ‘उमराव जान अदा द वेस्टेंड म्युझिकल’ नीतू चंद्रा यांच्या उमराव जानची खास अदा

राहुल गांधी म्हणाले की, सध्या कांद्याच्या भावाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. मात्र माध्यमांमध्ये तो दिसत नाही. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी महागाई, अग्नीवीर भरती. यासारख्या असंख्य समस्या असताना माध्यमांमध्ये मात्र यातील कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा केली जात नाही. त्याऐवजी बॉलीवूड आणि मोदींना 24 तास दाखवलं जातं. ते खोल समुद्रात जातात पुजा करतात. तर क्षणात हवाई उड्डाण घेतात. कोरोनात देखील तेच झालं. टाळ्या वाजवण्यात आल्या माध्यमांनी ते 24 तास दाखवलं.

“एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी होऊ शकतो पण, शरद पवार”… जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

त्यामुळे माध्यमांचं काम हे देशातील तरुणांचे लक्ष विचलित करणं एवढंच राहिलं आहे. तर हे केवळ देशातील वीस-पंचवीस उद्योगपतींसाठी सुरू आहे. तसेच दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांचं एक रुपयाचे हे कर्ज माफ न करता ज्याचं कृषी कायदे आणले. ज्यामुळे गेले कित्येक दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र दुसरीकडे देशातील अरबपतींचे 16 लाख कोटी कर्ज माफ करण्यात आलं. मात्र यूपीएच सरकार असताना 70 हजार कोटी रुपयांचा कर्ज माफ करण्यात आलं होतं.

त्यामुळे शेतकरी आणि उद्योगपती जर समान जीएसटी देत असतील. तर शेतकरी आणि सर्वसामान्यांचे देखील कर्ज माफ झाले पाहिजे. भाजपने एमएसपी लागू होऊ शकत नाही. असं सांगितलं आम्ही मात्र आमच्या जाहीरनाम्यामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे एमएसपी लागू करू असे स्पष्ट सांगितले आहे. असं म्हणत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना अश्वासन दिलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube