Bharat Jodo Nyay Yatra : कुत्र्याच्या मालकाला बिस्किट का दिलं? राहुल गांधींनी सांगून टाकलं

Bharat Jodo Nyay Yatra : कुत्र्याच्या मालकाला बिस्किट का दिलं? राहुल गांधींनी सांगून टाकलं

Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra)सुरु आहे. या न्याय यात्रेला जनतेकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका कार्यकर्त्याला कुत्र्याचे बिस्किट देताना पाहायला मिळाले. त्यावरुन भाजप (BJP)नेत्यांकडून राहुल गांधींवर जोरदार टीका होताना दिसत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी देखील राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘कायद्यापुढं सर्व समान’; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाच ठोठावला दंड!

भारत जोडो न्याय यात्रेकडून एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधींना भेटण्यासाठी गर्दी दिसत आहे. तर राहुल गांधी यांच्या गाडीच्या टपावर एक कुत्रा बसलेला दिसत आहे. या कुत्र्यासाठी गांधींनी बिस्कीटचा पुडा मागितला. त्यावेळी सभोवतालचे कार्यकर्ते त्यांचे फोटो काढताना दिसत आहेत. काहीजण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. राहुल गांधी कुत्र्याला बिस्कीट खाऊ घालत आहेत.

त्यांनी या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. मग राहुल एका क्षणासाठी ते बिस्किट पुन्हा प्लेटमध्ये ठेवतात. त्याचवेळी काँग्रेसचा एक कार्यकर्ता राहुल गांधींशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि हात पुढे करतो. पण, हस्तांदोलनाआधी राहुल गांधी तेच बिस्किट त्या कार्यकर्त्याच्या हातात देतात आणि नंतर हस्तांदोलन करतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राहुल गांधी यांच्या या कृत्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

संदिपान भुमरे यांना झटका: उद्धव ठाकरे यांनी शोधला नवा पर्याय

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही या व्हायरल व्हिडिओवरुन राहुल गांधीवर निशाणा साधला . पल्लवी सीटी नावाच्या एका युजरने राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर, पल्लवी जी, फक्त राहुल गांधीच नाही तर संपूर्ण कुटूंब मला ते बिस्किट खायला लावू शकलं नाही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया सरमा यांनी दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर भाजपकडून जोरदार टीका झाल्यानंतर आता राहुल गांधींनी आपली भूमिका मांडली आहे. राहुल गांधी म्हणाले की, मी कुत्र्याच्या मालकाला सोबत बोलावले. तो कुत्रा खूप घाबरलेला होता. मी त्याला बिस्किटे खायला द्यायचा प्रयत्न केला तेव्हा तो आणखी घाबरला. म्हणून मी कुत्र्याच्या मालकाला बिस्कीट दिले. मालकाने कुत्र्याला बिस्किट खाऊ घातल्यावर त्याने ते खाल्ले.

राहुल गांधी कुत्र्याला बिस्किट खाऊ घालतानाचा व्हिडिओ शेअर करत भाजपने राहुल गांधींवर आरोप केला होता की, कुत्र्यानं बिस्किट खाल्लं नाही तेव्हा राहुलने बिस्कीट आपल्या कार्यकर्त्याकडं दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube