Loksabha Election: महायुतीचा जागांचा तिढा सुटेना ! इकडे श्रीकांत शिदेंकडून नाशिकचा उमेदवारच जाहीर

  • Written By: Published:
Loksabha Election: महायुतीचा जागांचा तिढा सुटेना ! इकडे श्रीकांत शिदेंकडून नाशिकचा उमेदवारच जाहीर

Shrikant Shinde declare Hemant Godse for Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटप झालेली नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप हे मोठे पक्ष आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप झालेले नाहीत. महायुतीतील जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जागा वाटपासाठी थेट दिल्लीवारी करत आहेत. लवकरच जागा वाटप होईल, असे बोलले जात आहे. परंतु जागा वाटपापूर्वीच खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिकचा (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवार जाहीर केला आहे. खासदार हेमंत गोडसेच (Hemant Godse) येथून उमेदवार असणार आहे. त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचे असल्याची घोषणाच श्रीकांत शिंदेनी केली आहे.

Lok Sabha Election 2024 : एबीपी सी वोटरचा ओपिनियन पोल जाहीर, दक्षिणेत भाजपची वाट बिकटच!

नाशिकमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा होता. या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले, प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण नाशिकमध्ये राहणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो की हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक लोकसभेसाठी ते काम करत आहेत. दहा वर्षांपासून लोकसभेतील सहकारी म्हणून पाहतो आहे. त्यांची कार्यशैली वेगळी आणि कामाची आहे.

Ahmednagar : महसूल विभागातील मुघल, ब्रिटीश कालीन पदांची नावे बदलणार; मंत्री विखेंची माहिती

शांतिगिरी महाराजही निवडणुकीचा रिंगणात उतरणार, थेट मुख्यमंत्र्यांना तिकीट मागितले

जागा वाटपात ही जागा शिवसेनेला जाणार आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवार जाहीर करून टाकली. या मतदारसंघातून शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मला बिनविरोध निवडून द्यावे, असे इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. शांतिगिरी महाराज यांचा नाशिक जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे. तसेच जिल्ह्यातही त्यांचा मोठा संपर्क आहे. त्यामुळे तेही निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. तसेच त्यांनी लोकसभा मतदारसंघात दौरेही सुरू केलेले आहेत. ते नागरिकांनी भेटत आहेत. त्यामुळे हेमंत गोडसे यांचा शिवसेनेकडून पत्ता कट होईल व शांतिगिरी महाराज यांना तिकीट मिळेल, अशा चर्चा सुरू झाली होती. परंतु श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांची उमेदवारी जाहीर करून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube