Ahmednagar : महसूल विभागातील मुघल, ब्रिटीश कालीन पदांची नावे बदलणार; मंत्री विखेंची माहिती

Ahmednagar : महसूल विभागातील मुघल, ब्रिटीश कालीन पदांची नावे बदलणार; मंत्री विखेंची माहिती

Ahmednagar : राज्यातील महसूल विभागातील विविध पदांची नावे ब्रिटिश कालीन असून या पदनामांचा हिनतादर्शक शब्दप्रयोग होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. यामुळे ही नावे बदलण्याबाबत महसूल कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीबाबत सकारात्मकता दाखवून लवकरच ही पदनामे बदलून मराठीला साजेशी अशी नावे देण्याबाबत निर्णय करण्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

अजितदादांना बारामतीत डॅमेज केलं तर, आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू

राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी राज्याचे महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी विखे पाटील यांनी सांगितले की, महसूल विभागात पदाधिकारी, कर्मचारी काम करत असताना त्यांच्या पदांची नावे ही आजही मुघल अथवा ब्रिटीश कालीन आहेत. त्यातील कारकून, अव्वल कारकून ही नावे अद्यापही तशीच आहेत. नुकतेच तलाठी पदाचे ‘ग्राम महसूल अधिकारी’ असे नाव प्रस्तावित केले आहे. तर टंकलेखाचे नाव ‘महसूल सहाय्यक’ करण्यात आले आहे. कारकून हा शब्द सुद्धा हिनता दर्शक असल्याने त्याचे नामकरण ‘महसूल निरीक्षक’ करण्याच्या सूचना महसूल मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.यामुळे कर्मचारी संघटनेने समाधान व्यक्त करत महसूल मंत्री विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Ranji Trophy Final : व्वा रे पठ्ठा ! मुशीर खानने सचिनचा 29 वर्षांचा विक्रम त्याच्यासमोर मोडला !

या बैठकीत कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या, त्यात प्रामुख्याने महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध कर्मचारी कपात न करता लागू करणे, नायब तहसीलदार सरळ भरतीचे प्रमाण निश्चित करणे, प्रलंबित वैद्यकीय देयक आणि वेतन वेळेत मिळणे, महसूल सहाय्यक व तलाठी यांच्या ग्रेडपे मध्ये वाढ करणे. अव्वल कारकून आणि तलाठी पदासाठी समान परीक्षा पद्धती लागू करणे, पदोन्नती संदर्भातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणे तसेच महसूल विभागातील अव्वल कारकून यांचे पदनाम ‘महसूल निरीक्षक’ करणे अशा विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.

महसूल मंत्री विखे पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्यांच्या बाबत सकारात्मक भूमिका घेत विभागीय आयुक्त आणि अधिकार्यांना सूचना देत मागण्यांवर सखोल चर्चा करून मार्गी लावण्याचे निर्देश दिले. सदर बैठकीला महसूल विभागाचे अपर सचिव राजेशकुमार, सहसचिव संजय बनकर, सहसचिव श्रीराम यादव, राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे समन्वयक राजू धांडे उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज