अजितदादांना बारामतीत डॅमेज केलं तर, आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू

अजितदादांना बारामतीत डॅमेज केलं तर, आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेसाठी ( Lok Sbha Election 2024 ) बारामतीमध्ये मविआकडून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यात आता शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे. त्यावर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी शिवतारे यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले आहेत की, अजितदादांना बारामतीत डॅमेज केलं तर, आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू.

Ranji Trophy Final : व्वा रे पठ्ठा ! मुशीर खानने सचिनचा 29 वर्षांचा विक्रम त्याच्यासमोर मोडला !

यावेळी बोलताना परांजपे म्हणाले की, शिवतारे यांनी चुकीच्या अशा प्रतिक्रिया अजित पवार यांच्याबाबत दिल्या आहेत. सातत्याने शिवसेनेचा वाचारवीळ विजय शिवतरे हे आमच्या शक्तीस्थले,स्वाभिमानावर आघात करत असतील तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कल्याणमध्ये मग वेगळे चित्र, निर्णय दिसू शकते. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरा. कल्याण लोकसभेमध्ये वेगळा निकाल देखील लागू शकतो. महायुतीचे वातावरण चांगले राहावे असेज जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत असेल तर त्यांनी विजय शिवतारे यांना अडवावे. शिवतारे जर वैयक्तिक अजेंडा चालवत असतील तर मुख्यमंत्री यांना योग्य समज द्यावी. अशी मागणी परांजपे यांनी दिली आहे.

Sukh Kalale : स्पृहा जोशी झळकणार नव्या मालिकेत, प्रोमोने वेधलं लक्ष

दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. हाच धागा पकडून शिवतारेंनी आज कार्यक्रमात बोलत असताना पवारांवर तोफ डागली. ते म्हणाले की, सासवडच्या पालखीतळावर अजित पवारांनी केलेला अपमान हा केवळ विजय शिवतारेंचाच नाही, तर पुरंदरच्या तमाम स्वाभिमानी जनतेचा आहे. अजित पवार त्या अपमानासाठी इथं या येऊन या जनतेची माफी मागणार का, असा सवालही शिवतारे यांनी केला.

पुढं बोलतांना ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही. आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावं? बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात 5 लाख 80 हजार मतदार आहेत. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आरपारची लढाई करणार, आता बदला घ्यायची वेळ आली, त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ हवी… आता गुलामगिरी करणार नाही, असं म्हणत शिवतारे यांनी लोकसभा लढण्याचे संकेत दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube