Ranji Trophy Final : व्वा रे पठ्ठा ! मुशीर खानने सचिनचा 29 वर्षांचा विक्रम त्याच्यासमोर मोडला !

  • Written By: Published:
Ranji Trophy Final : व्वा रे पठ्ठा ! मुशीर खानने सचिनचा 29 वर्षांचा विक्रम त्याच्यासमोर मोडला !

Musheer Khan breaks Sachin Tendulkar’s Ranji record : रणजी ट्रॉफीचा अंतिम (Ranji Trophy Final) सामना मुंबई व विदर्भ संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळविला जात आहे. मुशीर खानच्या शानदार शतकाच्या जोरावर विदर्भासमोर धावांचा डोंगर उभा केलाय. याचबरोबर मुशीर खानने (Musheer Khan) सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रणजीमधील 29 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडलाय. पहिल्या डावात सहा धावा करणाऱ्या मुशीरने दुसऱ्या डावात 136 धावांची शानदार कामगिरी केलीय. मुशीरने वयाच्या 19 वर्ष 14 दिवसांत ही कामगिरी केली आहे. तर सचिन तेंडुलकरने 1994-95 च्या रणजीच्या अंतिम सामन्यात पंजाबविरुद्ध शतक झळकविले होते. सचिनने वयाचे 22 वर्ष पूर्ण करण्याच्या एक महिना अगोदर ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे मुशीरचे शतक होत असताना क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकर हा मैदानात होता. त्याने मुशीरचे अभिनंदन केले.

‘भारत जोडो न्याय’ यात्रेची महाराष्ट्रात एन्ट्री; डाव जिंकण्यासाठी राहुल गांधींनी बाहेर काढलं आदिवासी कार्ड

यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये मुशीरची जबरदस्त फलंदाजी झालीय. त्याने उपांत्यपूर्व फेरीत बडोद्याविरोधात द्विशतक झळकविले होते. त्याचे प्रथम श्रेणीतील क्रिकेटमध्ये हे दुसरे शतक आहे. मुंबईचा माजी क्रिकेटर वसीम जाफरनंतर अशी कामगिरी करणारा तो मुंबईचा दुसरा युवा फलंदाज ठरलाय. मुशीर हा सर्फराज खानचा लहान भाऊ आहेत. सध्या दोघे भाऊ क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा सर्फराज खान आता भारतीय संघात खेळत आहे. त्याने इंग्लंडिविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केलेली आहे.

‘शिर्डी’त नवं पॉलिटिक्स! खा. लोखडेंना वाढला विरोध; पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

तर मुशीर खान 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने या मालिकेत 360 धावांची खेळी केली आहे.

विदर्भासमोर धावांचा डोंगर

मुशीर खानचे शतक, कर्णधार अजिंक्य रहाणेचे अर्धशतक (73), श्रेयस अय्यरच्या 95 धावांच्या जोरावर मुंबईने विदर्भासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. विदर्भासमोर 538 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईचा दुसरा डाव 418 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात 119 धावांची आघाडी मिळाल्याने मुंबई आता मजबूत स्थितीत आहे. विदर्भाने दुसरा डावात बिनबाद दहा धावा केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज