Ranji Trophy: विदर्भाने नांग्या टाकल्या ! अजिंक्य रहाणे मुंबईसाठी संकटमोचक
Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) अंतिम सामना विदर्भ व मुंबई या संघात खेळविला जात आहे. पहिल्या डावात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. पण दुसऱ्या डावात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि मुशीर खान यांनी नाबाद अर्धशतक झळकवत सामन्यावर मजबूत पकड निर्माण केलीय. दुसऱ्या डावात मुंबईने (Mumbai) 260 धावांची आघाडी घेतलीय.
Electoral Bonds : खटले जिंकून देणाऱ्या साळवेंचा युक्तिवाद कुचकामी; सुप्रीम कोर्टाने उडवल्या चिंधड्या
अजिंक्य रहाणे हा 58 धावांवर खेळत आहे. त्याने 104 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार मारला. तर मुशीरनेही 135 चेंडूत 51 धावांची खेळी केली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 107 धावांची भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या जोरावर मुंबईने दोन बाद 141 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबईकडे अडीचशेपेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. त्यामुळे यंदाची 42 वी रणजी ट्रॉफी उंचविण्यासाठी मुंबई दावेदार ठरत आहे.
अमित शाहांचे शब्द खरे ठरले! देशात CAA कायदा लागू; गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी
पहिल्या डावात मुंबईला 119 धावांची आघाडी
पहिल्या दिवशी मुंबईचा डाव अवघ्या 224 धावांत आटोपला. पण दुसऱ्या दिवशी मुंबईच्या गोलंदाजांसमोर विदर्भाचे फलंदाज अपयशी ठरले. विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे मुंबईला 119 धावांची आघाडी मिळाली. पण दुसऱ्या डावात मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ (11) आणि भूपेन लालवानी (18) लवकर तंबूत परतले. यश ठाकूरने पृथ्वी शॉचा त्रिफळा उडविला. अनुभवी रहाणे आणि तरुण फलंदाज मुशीर या दोघांनी मुंबईचा डाव सांभाळला.
पहिल्या सत्रात विदर्भाचा खेळ खल्लास
आजच्या पहिल्याच सत्रात विदर्भाने तीन बाद 31 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. परंतु मुंबईच्या गोलंदाजांसमोर विदर्भाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. आदित्य ठाकरे याने 19 आणि यश राठोड 27 अशा सर्वाधिक धावा केल्या आहेत. मुंबईच्या तनुष कोटियान याने सात धावांत तीन फलंदाज बाद केले. धवल कुलकर्णी आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी तीन-तीन फलंदाज बाद केले.