Ranji Trophy 2024 इतिहासात पहिल्यांदाच होणार असा सामना; फायनलसाठी विदर्भ आणि मुंबई आमने-सामने
Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024 चा ( Ranji Trophy 2024 ) अंतिम सामना निश्चित झाला आहे. यामध्ये रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा सामना होणार आहे. ज्यामध्ये विदर्भ आणि मुंबई हे आमने-सामने येतील. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर 10 मार्चला खेळला जाईल.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफीचं अमित शाहांकडून प्रकाशन
यामध्ये मुंबईच्या टीमने सेमीफायनलमध्ये तामिळनाडूला हरवत फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं. त्यानंतर टूर्नामेंटच्या शेवटच्या दिवशी विदर्भाने देखील मध्य प्रदेशला 62 रन्सने पराभूत करत. फायनलमध्ये मुंबईसोबत सामना खेळण्याचं लायसन्स मिळवलं. त्यामुळे आता क्रिकेट चाहते हा सामना पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
पुलकित-क्रितीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होताच, सोशल मीडियावर चर्चांना उधाण…
या सामन्याबद्दल सांगायचं झालं तर रणजी ट्रॉफीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होत आहे की, महाराष्ट्रातीलच दोन टीम फायनलमध्ये आमने-सामने आल्या आहेत. रणजी ट्रॉफीचा हा 89 वा सिझन आहे. तर वानखेडे मैदानावर आतापर्यंत 11 वेळा रणजी ट्रॉफीची फायनल खेळवली गेली आहे. तर यावेळची फायनल ही वानखेडे मैदानावर खेळवली जाणारी 12 वी रणजी ट्रॉफीची फायनल असेल.
मुंबई ही रणजी ट्रॉफीची आतापर्यंतची सर्वात यशस्वी टीम आहे. तिने तब्बल 41 वेळा चॅम्पियन ठरली आहे. मात्र 2015-16 नंतर मुंबईने एकही अंतिम सामना जिंकलेला नाही. विदर्भाबद्दल सांगायचं झालं तर विदर्भाच्या टीमने अंतिम सामना खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. या अगोदरच्या दोन्ही वेळा त्यांनी अंतिम सामना जिंकत चॅम्पियन ठरले आहेत. त्यामुळे त्या तिसऱ्या वेळी आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवण्यात विदर्भ यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.