शाब्बास, टीम इंडिया; क्रिकेटचा ‘देव’ सचिनकडूनही भारतीय महिला संघाचं कौतूक

भारतीय महिला संघाने विश्चचषकावर नाव कोरल्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत संघाचं कौतूक केलंय.

Untitle (19)

World Cup : महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजत भारतीय महिला संघाने (World Cup) 52 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवलायं. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचं सर्वच स्तरातून कौतूक केलं जात आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरकडूनही भारतीय महिला संघाचं कौतूक करण्यात आलंय. शाब्बास, टीम इंडिया संपूर्ण देशाला तुमचा अभिमान असल्याचं ट्विट करीत सचिनने टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केलायं.

सचिन तेंडूलकरने ट्विटमध्ये म्हटलं, 1983 ने एका पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. आज आपल्या महिला क्रिकेट संघाने खरोखरच काहीतरी खास केलंय, त्यांनी देशातील असंख्य तरुणांच्या हातात बॅट अन् बॉल घेण्याची, एक दिवस त्या देखील ही ट्रॉफी उचलण्याची प्रेरणा दिलीयं. भारतीय महिला क्रिकेट प्रवासातील हा एक निर्णायक क्षण. शाब्बास, टीम इंडिया संपूर्ण देशाला तुमचा अभिमान, असं सचिनने म्हंटलंय.

भारताचा दक्षिण अफ्रिकेवर तीन गडी राखून दणदणीत विजय, मालिकेत घेतली 1-0 ने आघाडी

भारतीय महिला संघाने विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर भारतीय महिला संघावर बक्षीसाचा पाऊसच पडत आहे. आयसीसीकडून भारतीय संघाला 40 कोटी तर बीसीसीआयकडून 51 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. यासोबत सर्वच स्तरातून टीम इंडियाचं कौतूक केलं जात आहे.

follow us