उपमुख्यमंत्री पदाच्या विक्रमानंतर अजित पवारांचा दुसरा विक्रम; सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदी

उपमुख्यमंत्री अजित पवार आता सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत....

  • Written By: Published:
News Photo   2025 11 02T174211.306

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या (Ajit Pawar) अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. त्याचाच एक भाग म्हणून अजितदादांचा गट आपल्या भाजपा या मित्रपक्षाशी चर्चा करत होता. दरम्यान, आता या चर्चेतून तोडगा निघाला असून अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्य अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झालेली आहे. एकूण 31 सदस्य संघटनांपैकी 22 संघटनांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे.

LIVE : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली! भारताची प्रथम फलंदाजी, पावसामुळे किती षटकांचा सामना?

31 सदस्य संघटनांपैकी 22 पेक्षा जास्त संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या पॅनेलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक न होता त्या पदावर विराजमान झाले. तर, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनचे(MOA) अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे.

मोहोळ यांच्या गटाला काही काही पदे देणार

ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पदे देण्याचे ठरले असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us