LIVE : दक्षिण अफ्रिकेला पहिला धक्का, ब्रिट्स झाली धावचीत, टीम इंडियाचं जोरदार क्षेत्ररक्षण
भारत आणि दक्षिण आफ्रिका हा फायनल सामना सुरुवातीला तीन वाजता सुरु होणार होता. पण पावसामुळे फायनल सामना सुरु होण्यासाठी बराच विलंब झाला.
महिला विश्वचषक स्पर्धा 2025 चा फायनल सामन्याचा थरार (India) आज नवी मुंबईत रंगणार आहे. फायनलचा थरार हा भारत आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रंगणार आहे. भारताने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला धुळ चारली होती आणि फायनच्या तिकीटावर आपले नाव कोरले होते. आता फायनल सामन्याचे नाणेफेक हे दक्षिण आफ्रिकाने जिंकले आणि प्रथम करण्याचा बॉलिंग निर्णय घेतला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका हा फायनल सामना सुरुवातीला तीन वाजता सुरु होणार होता. पण पावसामुळे फायनल सामना सुरु होण्यासाठी बराच विलंब झाला. अखेर 4.32 ला नाणेफेक झाली आणि सामना पूर्णपणे 50 षटकांचा होणार आहे. दरम्यान, आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 फायनलला सुरुवात झाली आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेने भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात बॅटिंगसाठी आली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिलं षटक हे निर्धाव टाकलं.
भारत 200 पार
भारताला धमाकेदार सुरुवातीनंतर 3 झटके बसले आहेत. दक्षिण आफ्रिकेने भारताच्या स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स या तिघींना आऊट केलं. त्यानंतर आता कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा ही जोडी खेळत आहे. या जोडीवर मोठी भागीदारी करण्याची जबाबदारी आहे.
दक्षिण आफ्रिकेने भारताला तिसरा झटका देत जोरदार कमबॅक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेने स्मृती मंधाना, शफाली वर्मा हीच्यानंतर जेमीमा रॉड्रिग्स हीला आऊट केलं आहे. जेमीने 37 बॉलमध्ये 24 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेने भारताला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताची सेट ओपनर शफाली वर्मा हीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. शफालीने 78 बॉलमध्ये 87 रन्स केल्या.
