Ind vs Nz : टॉस जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय; हार्दिक अन् शार्दूल संघाबाहेर; सुर्या-शमीला संधी

Ind vs Nz : टॉस जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय; हार्दिक अन् शार्दूल संघाबाहेर; सुर्या-शमीला संधी

धर्मशाला : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  सामन्याच्या दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दव पडल्यामुळे फलंदाजी काहीशी सोपी आणि गोलंदाजी अवघड होते. दवामुळे बॉल हातातून साबणाच्या पट्टीसारखा निसटतो. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. (India have won the toss and elected to bowl first in the match against New Zealand)

प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल :

दरम्यान, हार्दिक पांड्या अद्यापही तंदुरुस्त न झाल्याने भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. हार्दिकसोबतच शार्दुल ठाकूरलाही बाहेर बसावण्यात आले आहे. हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव आणि शार्दुलच्या जागी मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे. या सामन्यात भारतीय संघाकडे गोलंदाजीचे 5 पर्याय आहेत. टॉप-6 फलंदाजांपैकी कोणीही नियमितपणे गोलंदाजी करत नाही.

धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण?

त्याचवेळी न्यूझीलंडचा संघही नियमित कर्णधार केन विल्यमसनशिवाय मैदानात उतरला आहे. शुक्रवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान विल्यमसनचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे 78 धावांवर खेळत असतानाच त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते. विल्यमसनच्या जागी टॉम लेथमकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

सामन्यावर पावसाचे सावट :

या सामन्यावर सध्या पावसाचे सावट आहे. पावसामुळे हा सामना पूर्ण होण्याची आशा फारच कमी आहे किंवा कमी षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 17 ऑक्टोबर रोजी धर्मशालामध्येच झालेला नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पावसामुळे 43 षटकांचा खेळवण्यात आला होता.

Accuweather नुसार, रविवारी धर्मशालामध्ये कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. या दिवशी पावसाची शक्यता 42 टक्के आहे. आकाश ढगाळ असेल आणि वाऱ्याचा वेग 26 किमी/ताशी असेल.

World Cup 2023 : गतविजेता इंग्लंड आता ‘डेंजर झोन’मध्ये; वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचे संकट

 धर्मशालामध्ये दुपारी 2 वाजता पावसाची शक्यता 51 टक्के आणि दुपारी 3 वाजता 47 टक्के आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे 3 वाजल्यानंतर पावसाची शक्यता खूपच कमी आहे. 4 ते 6 या वेळेत पावसाची शक्यता 14 टक्के असणार आहे. यानंतर ही शक्यता 2 टक्क्यांपर्यंत राहील. यामुळेच सामना उशिरा सुरू होऊ होऊन कमी षटकांचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन :

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (wk/c), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube