‘भारत जोडो न्याय’ यात्रेची महाराष्ट्रात एन्ट्री; डाव जिंकण्यासाठी राहुल गांधींनी बाहेर काढलं आदिवासी कार्ड

‘भारत जोडो न्याय’ यात्रेची महाराष्ट्रात एन्ट्री; डाव जिंकण्यासाठी राहुल गांधींनी बाहेर काढलं आदिवासी कार्ड

Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीचा डाव जिंकण्यासाठी राहुल गांधींकडून (Rahul Gandhi) आता आदिवासी कार्ड बाहेर काढण्यात आल्याचं दिसून येत आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये आज आदिवासी न्याय सम्मेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाचा गौरव करीत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? अजितदादांनी सांगितला खास फॉर्म्युला

आदिवासी न्याय सम्मेलन मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आदिवासी आणि वनवासी शब्दाचा अर्थ सांगत भाजपवर सडकून टीका केली आहे. आदिवासी म्हणजे देशाचे मूळ मालक आहेत. आणि वनवासी म्हणजे जंगलात राहणारे लोकं. भाजपकडून जंगले संपवण्याचा प्रकार सुरु असून जंगले संपल्यानंतर वनवासी राहणारच नाहीत. त्यामुळे भाजप आदिवासींचा वनवासी असा उल्लेख करीत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षणातील हिंसाचार चौकशीसाठी एसआयटी गठित; संदीप कर्णिकांवर जबाबदारी !

युपीए सरकारच्या काळात आदिवासींना आम्ही ओळख दिली. आधारकार्डच्या माध्यमातून आदिवासी लोकांना भारताचे मूळ मालक असल्याची खरी ओळख मिळाली आहे. त्यावेळी आम्हाला आदिवासींना संदेश द्यायचा होता की, तुम्ही या देशाचे खरे मूळ मालक आहात, पण सध्या देशातले जंगले भाजपकडून संपवले जात आहेत. जंगले संपवून भाजपला आदिवासींना रस्त्यावर आणायंच असल्याची जहरी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.

दरम्यान, देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वार वाहु लागताच एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्या येत आहे. अशातच इंडिया आघाडीतीलही काही घटक पक्ष फोडण्यात एनडीए यशस्वी ठरत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता आगामी काळात इंडिया आघाडीकडून देशात खेळण्यात येत असलेलं आदिवासी कार्ड किती उपयुक्त ठरणार? हे आता आगामी निवडणुकांच्या निकालानंतरच समजू शकणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज