महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? अजितदादांनी सांगितला खास फॉर्म्युला
Ajit Pawar Comment on Mahayuti Seat Sharing : महायुतीतील जागावाटपावर अजून चर्चा सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारांची नाव अंतिम झालेली नाहीत. कोणती जागा कुणाला द्यायची यावर एकमत होत नाही. काही ठिकाणी तर धुसफूस वाढली आहे. जागावाटपाच्या सगळ्याच बैठका आता दिल्लीत होत आहे. महायुतीतीची पुढील बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. या घडामोडी घडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सातारा दौऱ्यावर होते. येथे त्यांनी महायुतीच्या जागावाटपावर सूचक वक्तव्य केले. बैठका दिल्लीत होत असून अद्याप काहीच निश्चित झालेलं नाही. परंतु, तिन्ही पक्षांत प्राथमिक चर्चा झाली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांना दिली.
अजित पवार पुढे म्हणाले, काल दिल्लीत महायुतीची बैठक होणार होती. परंतु, या दिवशी भाजप बोर्डाची बैठक होती. त्यामुळे आता ही बैठक आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून चर्चा केली जात आहे. प्रत्येकाचा योग्य मान सन्मान राखला जाईल. कार्यकर्त्यांना समाधान वाटेल असा तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
बहुतेक विद्यमान जागा त्या त्या पक्षांना सोडण्याची प्राथमिक चर्चा झाली आहे. तरीदेखील अंतिम चित्र लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणर आहे कारण, येत्या 14 किंवा 15 तारखेला लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार गटाचे 12 बडे नेते लवकरच भाजपात जाणार; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा
वक्तव्यांनी वातावरण खराब करू नका
दरम्यान, माजी आमदार विजय शिवतारे यांनी केलेल्या टीकेवरही अजित पवार यांनी थोडक्या उत्तर दिले. त्यांच्या (विजय शिवतारे) विधानाबद्दल मला काहीच बोलायचं नाही. राजकारणा सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवला पाहिजे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर काय तो निर्णय घेतला जाईल. परंतु, महायुतीतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वातावरण खराब होईल अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले होते शिवतारे ?
बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसून, आता गुलामगिरी नव्हे तर, बदला घ्यायची वेळ आली आहे, असा एका जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी खुले आव्हान देत शिवतारे यांना पराभवाचा धक्का दिला होता. महायुती झाली असली तरी त्याची खंत शिवतारे यांच्या मनात आहे.
Sunil Tatkare : अजितदादा भेकड असते तर?; शरद पवार गटाची टीका तटकरेंच्या जिव्हारी