अजित पवार गटाचे 12 बडे नेते लवकरच भाजपात जाणार; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा
Maharshtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. पात्र दुसरीकडे राज्यांमध्ये पक्षांतराचे वारे ( Maharshtra Politics ) देखील वाहत आहेत. यामध्ये आता अजित पवार गटातील मोठे बारा नेते भाजपमध्ये जाणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी तसा दावा केला आहे.
WTC न्युझीलंडवर ऑस्टेलियाचा विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये फेरबदल; भारत अव्वल स्थानी कायम
धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा ने ठगा नही
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत…
— Atul Londhe Patil (@atullondhe) March 11, 2024
काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ट्विट करत हा खळबळ जनक दावा केला आहे की, ‘धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा ने ठगा नही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 12 बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार! सूत्रांची माहिती’ असं म्हणत लोंढे यांनी हा दावा केला आहे.
आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!
दरम्यान सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यामध्ये कार्यकर्त्याने नेत्यांचं पक्षांतर देखील होत आहे. या पक्षांतरामध्ये सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षांमध्ये किंवा विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षांमध्ये असंच हे पक्षांतर सुरू आहे. असं नाही तर मित्र पक्षांमध्ये देखील हे पक्षांतर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यानच आता काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केलेल्या अजित पवार गटाचे बारा बडे नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.