Loksabha Elections 2024 : 80 टक्के काम पूर्ण, 20 टक्के उमेदवारांबाबत आम्ही तिघे… फडणवीसांनी केलं स्पष्ट
Loksabha Elections 2024 : आगामी निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यात महायुती महायुतीच्या जागा वाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपने ते अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक घेतली. त्यानंतर दिल्लीमध्ये देखील जागा वाटपावर चर्चा करण्यात आली.
‘…तर मी तुमच्यासोबत नसेल’, भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार का?
मात्र अद्यापही महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही. पण या बैठकीतील चर्चा सकारात्मक झाल्याने महायुतीचा 80% जागावाटप पूर्ण झाला आहे. त्यात आता 20 टक्के उमेदवारांबाबत आम्ही तिघे फोनवर किंवा प्रत्यक्ष बैठक घेऊन चर्चा करू. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे उर्वरित जागांबाबत लवकरच निर्णय घेऊन महाराष्ट्राची यादी जाहीर केली जाईल. कारण सर्वच निर्णय एका बैठकीत होत नाहीत. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ममतांनी केली 42 उमेदवारांची घोषणा: युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद यांना लॉटरी
त्याचबरोबर यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मनसे बाबतच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिल. फडणवीस म्हणाले, राज ठाकरे संदर्भात आमची भूमिका यापूर्वीच आम्ही स्पष्ट केली आहे. मनसेने व्यापक भूमिका घेतली आहे आणि ती भूमिका आमच्या विचारांशी विसंगत नाही. महाराष्ट्रात राहून मराठी मुद्द्याबद्दल बोलणे योग्यच आहे. पण तरीही मनसे बाबत युतीचे आम्ही कुठलेही संकेत दिले नसल्याचं यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलं.