Loksabha Election: मंत्री विखेंना लोकसभेचे तिकीट : सुजय यांचा पत्ता कट होणार?

Loksabha Election: मंत्री विखेंना लोकसभेचे तिकीट : सुजय यांचा पत्ता कट होणार?

प्रविण सुरवसे- लेट्सअप मराठी

Loksabha Election 2024 : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका (Loksabha Election) या होणार आहे. मात्र त्यापूर्वीच नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजपकडून लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली मात्र महाराष्ट्राची लोकसभेची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. यातच नगर जिल्ह्यात यंदा धक्का तंत्र अवलंबले जाते कि अशी शंका निर्माण झाली आहे. याला कारण म्हणजे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांची उमेदवारी यंदा धोक्यात असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तर भाजपकडून विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात निर्माण झाल्या आहेत. मात्र सुजय विखे यांचा पत्ता कट करून मंत्री विखे यांना उमेदवारी देत त्यांचे राज्यातील महत्व कमी करण्याचा प्रत्यन असल्याच्या देखील चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. मोठा राजकीय वारसा असलेल्या विखे कुटुंबियांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी हा डाव आखला जात असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभेसाठी भाजपकडून धक्कातंत्र
येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नुकतीच 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीत भाजपच्या महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. राज्यात सध्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांचे महायुतीचे सरकार आहे. महायुतीतल्या या पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाहीये. मात्र उमेदवारांची निवड करताना भाजप नेतृत्त्वाकडून यंदा काही राज्यातील मतदारसंघांमध्ये धक्कातंत्राचा पुरेपूर वापर करण्याची शक्यता आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यात विद्यमान खासदार सुजय विखे यांचे नाव चर्चेत असताना स्वपक्षातूनच त्यांना आव्हान देण्यात आले. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी देखील आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले. यामुळे नगर जिल्ह्यातील उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे.

विखे विरोधक एकवटले…
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या विखे पिता पुत्रांविरोधात जिल्ह्यातील भाजपचे प्रस्थापित नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. विखे पिता-पुत्रांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही. अपमानास्पद वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप पक्षातीलच नेत्यांकडून होऊ लागला. यातच भाजप आमदार राम शिंदे व विखे कुटुंबियांमधील वाद हा काही लपून राहिलेला नाही. तो वेळोवेळी पुढे आलेला आहे आणि वाढत आहे. अनेकदा राजकीय मंचावर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध देखील रंगल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे विखेंच्या बालेकिल्ल्यात त्यांना कोल्हे गटाकडून देखील कोंडीत पकडण्याचा डाव सुरूच आहे. स्वपक्षातीलच नेते तसेच पदाधिकारी विखे यांच्या विरोधात नाराज असल्याने विखेंची राजकीय कोंडी होऊ लागली आहे.

मतदारसंघातील वाद मिटवताना बारामतीच्या ‘दादांना’ नाकीनऊ : पुण्याचे ‘दादा’ पुन्हा करणार मध्यस्थी

केंद्रीय नेत्यांशी संपर्क…राज्यातील नेत्यांना खटकला
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राधाकृष्ण विखे हे महसूलमंत्री झाले. मंत्री विखे हे राज्यापेक्षा केंद्रात वरिष्ठ नेत्यांशी सतत संपर्क ठेवू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे त्यांनी वेगवेगळ्या कारणातून संपर्क वाढवला. आपल्यामतदार संघामध्ये देखील नेत्यांची वर्दळ त्यांनी सुरु ठेवली. विखे यांचे केंद्रात वाढते वजन राज्यातील भाजप नेत्यांना आव्हान ठरू लागले. यामुळे राज्यातील नेतेमंडळी देखील विखे यांच्या विरोधात अप्रत्यक्ष उतरले. यातच काही दिवसांपूर्वी भावी मुख्यमंत्री म्ह्णून विखे यांचे पोस्टर देखील झळकले यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली. यातच येणाऱ्या लोकसभेचे तिकीट राधाकृष्ण विखे यांना देत त्यांना दिल्लीत पाठवत त्यांचे राज्यातील राजकीय वजन कमी करण्यासाठी डावपेच आखले जात असल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूरमध्ये दोन राजघराणे येणार आमने-सामने? शाहू महाराजांविरोधात समरजीतसिंह घाटगेंची चर्चा

सुजय विखेंना ‘या’ गोष्टींचा फटका बसणार
अद्याप महाराष्ट्रातील भाजपची लोकसभेची उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही, मात्र भाजपकडून नगर दक्षिणेसाठी प्रबळ दावेदार समजले जाणारे सुजय विखे यांच्या तिकीटबाबतच्या आशा का मावळू लागल्या आहेत ते आपण जाणून घेऊ…सुजय विखे 2019 मध्ये निवडून आले मात्र त्यानंतर गेली चर्च वर्षे त्यांचा जनसंपर्क हा खूप कमी राहिला. लोकांशी तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद न साधने, गाठीभेटी न घेणे यामुळे भाजपचे स्थनिक पदाधिकारी नाराज होते, तर अशीच परिस्थिती काही मतदारसंघांमध्ये देखील निर्माण झाली. यामुळे पुन्हा विखेंच्या उमेदवारीसाठी पक्षातूनच रोष वाढला. तसेच भाजपकडून घराणेशाही विरोधात सुरु असलेला अजेंडा देखील सुजय विखे यांच्या लोकसभा तिकिटाला अडसर ठरू लागला. या गोष्टींचा एकत्रित फटका हा सुजय विखे यांना बसणार अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे.

महायुतीला मोठा धक्का : अजितदादांचा भाजपविरोधात लढण्याचा निर्णय; सर्वच जागांवर स्वबळाचा हुंकार!

विखेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
2019 च्या निवडणुकीवेळी सुजय विखे यांना उमेदवारी न मिळाल्याने गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या राधाकृष्ण विखे यांनी पक्षाला रामराम ठोकला व भाजपात प्रवेश केला. सुजय विखे खासदार झाले मात्र 2024 साठी त्यांच्याजागी राधाकृष्ण विखे यांना तिकीट देण्याच्या चर्चा आहे, मात्र यामुळे मुलाचे राजकीय कारकीर्द धोक्यात येणार असल्याने मंत्री विखे लोकसभा तिकीट घेणार का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. राजकीय प्राबल्य असलेला विखे धाडसी निर्णय घेण्यासाठी देखील तेवढेच परिचित आहे यामुळे येत्या काळात उमेदवारी व तिकीट वाटपावरून विखे कुटुंबीय काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज