मतदारसंघातील वाद मिटवताना बारामतीच्या ‘दादांना’ नाकीनऊ : पुण्याचे ‘दादा’ पुन्हा करणार मध्यस्थी

मतदारसंघातील वाद मिटवताना बारामतीच्या ‘दादांना’ नाकीनऊ : पुण्याचे ‘दादा’ पुन्हा करणार मध्यस्थी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात युतीतील वाद मिटविताना उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मागील आठवड्यात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही पक्षांच्या आजी-माजी आमदारांची मंत्रालयात बैठक पार पडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 17 आणि 18 मार्च रोजी बारामतीमध्ये बैठक पार पडणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या आजी-माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि अन्य महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलविण्यात आले आहे.

बारामती मतदारसंघात महायुतीमध्ये तीन तालुक्यांमध्ये कमालीचे वाद आहेत. यात इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे, पुरंदरमध्ये विजय शिवतारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस तर दौंडमध्ये राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात असे वाद सुरु आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांच्या विजयात हे वाद अडसर ठरु शकतात. याती एका जरी गटाने अजितदादांची साथ देण्यास नकार दिला तर तो त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरु शकतो. त्यामुळे हे वाद मिटविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. समन्वय बैठका घेण्यात येत आहेत. (Deputy Chief Minister Ajit Pawar has to do a lot of work while resolving the dispute in the alliance in Baramati Lok Sabha constituency.)

रोहित पवारांची अजितदादांवर जहरी टीका : धरण, सिंचन सगळच काढलं

इंदापूरचा मोठा पेच :

हर्षवर्धन पाटील यांनी आधी विधानसभेचा शब्द द्या म्हणून अजितदादांपुढे अट टाकली आहे. त्याचवेळी पाटील यांनी आपल्याला राष्ट्रवादीकडून धमक्या येत असल्याचाही आरोप केला आहे. पण दत्तात्रय भरणे यांच्या रुपाने इंदापूरची हक्काची असलेली जागा कशी सोडायची असा पेच अजितदादांपुढे आहे. त्यातून आता हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. अजितदादांनीही हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही साखर कारखान्यांना कर्जाची थकहमी म्हणून जवळपास 225 कोटी रुपये देऊ केले आहेत.

दौंडमध्ये राष्ट्रवादीला आघाडी मिळवून देण्याचे आव्हान :

दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल भाजपमध्ये तर माजी आमदार रमेश थोरात अजितदादांसोबत आहेत. दोघेही महायुतीत असल्याने सुनेत्रा पवार यांच्यासाठी काम करावे लागणार आहे. गतवेळी सुप्रिया सुळे यांना दौंडमध्ये आघाडी मिळाली नव्हती. आता मात्र सुनेत्रा पवार यांच्यासाठी दौंडमध्ये आघाडी मिळविणे हे आव्हान असणार आहे. याचसाठी कुल आणि थोरात या दोन्ही गटांनी एकत्रित काम करावे यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचमुळे अजित पवार यांनी दोघांमधील वाद मिटविण्यासाठी कंबर कसली आहे.

त्यांचा पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्या माणसांची मोळी; राज ठाकरेंकडून शरद पवार टार्गेट

अजितदादांपुढे शिवतारेंची अट :

पुरंदरमध्ये शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील वाद टोकाचा बनला होता. शिवतारे यांनी एका प्रचार सभेत शरद पवार यांच्यावर एक वादग्रस्त टीका केली होती. ती टीका अजितदादांना चांगलीच लागली. त्यावेळी अजित पवार यांनी बारामती येथे विजय शिवतारे यंदा आमदार कसा होतो ते मी पहातोच, असे म्हणत त्यांना जाहीर आव्हान दिले. त्यानंतर निकालात काँग्रेसच्या संजय जगताप यांनी 30 हजार मतांनी शिवतारे यांचा पराभव केला. आता शिवतारे शिंदेंसोबत शिवसेनेत आहेत. आता त्यांनीही लोकसभेत मदत पाहिजे असली तर आधी विधानसभेचा शब्द द्या, अशी मागणी केली आहे. ज्या शिवतारेंना चॅलेंज देऊन पाडले त्यांनाच विजयी करण्साठी प्रयत्न कसे करायचे, हा प्रश्न अजितदादांपुढे असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज