रोहित पवारांची अजितदादांवर जहरी टीका : धरण, सिंचन सगळच काढलं

रोहित पवारांची अजितदादांवर जहरी टीका : धरण, सिंचन सगळच काढलं

Rohit Pawar on Ajit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रोच्या (Baramati Agro) कन्नड येथील साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. यावरुन रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीय, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी म्हटले की युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने ८०० कि.मी.ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला’ अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या ‘मित्रा’बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे. पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का? असा सवाल करत रोहित पवार यांनी प्रथमच अजित पवार यांच्यावर जहरी टिका केली आहे.

बारामतीमध्ये नणंद -भावजयी सामना, पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांची गळाभेट

माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीय. हव्या त्या मंत्रीपदासाठी आणि तिकीटासाठी तुम्ही शंभर दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही, असा टोला रोहित पवार यांनी लागवला आहे.

महायुतीचे दिल्लीत जागावाटप फायनल; तब्बल अडीच तास बैठक, शिंदे-पवार एकाच विमानातून मुंबईकडे

त्यांनी पुढं म्हटले की, बारामती अॅग्रोच्या कन्नड येथील साखर कारखान्याच्या मालमत्तेवर ईडीने प्रोविजनल जप्ती आणली आहे. परंतु, त्या अनुषंगाने असा कोणताही आदेश किंवा माहिती अधिकृतरित्या बारामती अॅग्रो लि. ला कळविण्यात आलेली नाही. प्रोविजनल जप्ती ही मूलतः राजकीय सुडापोटी केलेली असून चुकीची, निराधार व बेकायदेशीर आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेसला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश ठरला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube