महायुतीचे दिल्लीत जागावाटप फायनल; तब्बल अडीच तास बैठक, शिंदे-पवार एकाच विमानातून मुंबईकडे

महायुतीचे दिल्लीत जागावाटप फायनल; तब्बल अडीच तास बैठक, शिंदे-पवार एकाच विमानातून मुंबईकडे

Loksabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते परंतु महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे राज्यातील महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले होते. काल मध्यरात्री अमित शहांच्या निवासस्थानी तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीत राज्यातील महायुतीचे जागावाटप फायनल झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. पण ही बैठक दोन टप्प्यात झाल्याची चर्चा आहे. पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे सोबत चर्चा झाली तर दुसऱ्या टप्प्यात अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहेत.

‘तुझं माझं जमेना, आकड्यांचा तिढा सुटेना’; ‘वंचित’चं ‘मविआ’ला खरमरीत पत्र

या बैठक राज्यातील लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये भाजप 26 तर मित्र पक्ष 22 जागा लढणार असे निश्चित झाल्याचे मानले जाते. यामध्ये शिंदे गटाला 13 आणि अजित पवार गटाला 9 जागा सुटण्याची शक्यता आहे.

मध्यरात्री बैठक संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूरकरकडे रवाना झाले होते. त्यामुळे आता महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बारामतीमध्ये नणंद -भावजयी सामना, पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांची गळाभेट

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. त्यामुळे राज्यात महायुतीत जागावाटपावरुन वाद असल्याची चर्चा सुरु झाली होती. शिंदे गटाने किमान 18 जगांवर दावा केला होता तर अजित पवार गटाने शिंदेंना जेवढ्या जागा असतील तेवढ्याच जागा आम्हाला देखील हव्यात अशी मागणी केली होती. त्यामुळे महायुतीचे जागावाटप रखडले होते.

Congress च्या पहिल्या यादीत 15 सर्वसामान्यांसह SC-ST, OBC उमेदवारांची संख्या किती जाणून घ्या…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube