मराठा आरक्षणातील हिंसाचार चौकशीसाठी एसआयटी गठित; संदीप कर्णिकांवर जबाबदारी !

  • Written By: Published:
मराठा आरक्षणातील हिंसाचार चौकशीसाठी एसआयटी गठित; संदीप कर्णिकांवर जबाबदारी !

SIT formed to probe violence in Maratha reservation: मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या. बीडमध्ये थेट आमदारांचे घरे जाळण्यात आली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातही हिंसक आंदोलनाचे पडसाद उमटले. अध्यक्षांनी आंदोलनातील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापना करण्याचे आदेश दिले होते. आता गृहविभागाने एसआयटी स्थापना केली आहे. एसआयटीचे प्रमुख नाशिक शहराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) हे असणार आहेत.

Electoral Bonds : खटले जिंकून देणाऱ्या साळवेंचा युक्तिवाद कुचकामी; सुप्रीम कोर्टाने उडवल्या चिंधड्या

राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या. त्यात एसटीची तोडफोड झाली होती. तर बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जाळण्यात आले होते. माजलगावमध्ये जाळपोळीची घटना घडली होती. या चौकशी संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी करणार आहे. राज्यातील आंदोलने सुरू असताना आंदोलनाचा गैरफायदा होऊन सामाजिक, सलोखा, वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ, दगडफेकीसारख्या हिंसक घटना घडल्या होत्या. या घटना जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे, तसेच मीडिया, सोशल मीडिया, सोशल मीडियाचा गैरवापर करून चुकीची माहिती देऊन तसेच अफवा पसरवून दंगे भडकाविण्याचा प्रयत्न करणे, याबाबत ही एसआयटी चौकशी करणार आहे. या चौकशीचा अहवाल तीन महिन्यात सरकारला द्यायचा आहे.

लेट्सअप विश्लेषण : शिवतारे खरंच बारामतीमधून लढणार की, केवळ पोकळ आव्हान?

कर्णिकांना काय अधिकार ?
या पथकात निमंत्रित सदस्य म्हणून तज्ज्ञ व्यक्तींना बोलविण्याचा अधिकार कर्णिक यांना असणार आहेत. त्याचबरोबर विशेष तपास पथकासाठी आवश्यक मनुष्यबळ शासनाचा सहमतीने नियुक्तीचा अधिकार तपास पथक प्रमुखांना असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube