Beed violence : बीड जाळपोळप्रकरणी आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक; एसपी म्हणाले, अनेक आरोपी फरार

  • Written By: Published:
Beed violence : बीड जाळपोळप्रकरणी आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक; एसपी म्हणाले, अनेक आरोपी फरार

Beed Crime News : काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीवरून बीडमध्ये आक्रमक झालेल्या जमावाने मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड केली होती. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं होतं. दरम्यान, बीड जाळपोळ प्रकरणी (Beed violence case) पोलिसांनी आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर (Nand Kumar Thakur) यांनी दिली.

श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी देणगीची मागणी : फसवणूक करणारे रॅकेट ‘विहिंप’कडून उघडकीस 

आज माध्यमांशी बोलतांना पोलिस अधिक्षक ठाकूर म्हणाले, बीड जाळपोळ प्रकरणी मोठ्या प्रमाणात अटकसत्र सुरू आहे. आतापर्यंत 307 आरोपींना अटक करण्यात आली. अजून बरेच आरोपी फरार आहेत. इतर फरार आरोपींनाही आम्ही लवकरच अटक करू. या अटक सत्रामुळं आरोपींना एक जरब बसला. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी बीड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही ठाकूर यांनी सांगितलं.

‘राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दोन पक्ष BJP ला पाठिंबा देणार’; राणा दाम्पत्याचा मोठा दावा

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांनी दिला.

दोन महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांचं अंतरवली सराटीत उपोषण सुरू होतं. त्यावेळी या आंदोलनानने हिंसक वळण घेतलं होतं. 30 ऑक्टोबर रोजी माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आंदोलकांना आग लागली होती. त्याला कारण होतं मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य. त्यानंतर बीडमधील शासकीय कार्यालय, राजकीय पक्षांची कार्यायलही आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत. आधी राष्ट्रवादी भवन जाळण्यात आलं. नंतर जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय, शिवसेना जिल्हाप्रमुखांची कार्यालयं, आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर, भुजबळ यांचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांचे हॉटेल अशा एकापाठोपाठ जाळपोळीच्या घटना घडल्या. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांचे अटकसत्र अद्यापही सुरूच आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा पेटला असून त्यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटस संपला. मात्र, सरकारने कोणताही कार्यवाही न केल्यानं 20 जानेवारीपासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाकडून आमरण उपोषण केले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या