‘राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दोन पक्ष BJP ला पाठिंबा देणार’; राणा दाम्पत्याचा मोठा दावा

  • Written By: Published:
‘राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दोन पक्ष BJP ला पाठिंबा देणार’; राणा दाम्पत्याचा मोठा दावा

Navneet Rana : पुढील वर्षात राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Lok Sabha and Assembly Elections) होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. राज्यात भाजप विरुध्द शरद पवार यांची राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि कॉंग्रेस एकत्रित निवडणूक लढवत आहेत. मात्र, या तीनही पक्षात जागा वाटपाबाबत एकमत नाही, यावरून आता खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मोठा दावा केला. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राज्यात आण देशात विरोधकांच्या आघाडीत फुट पडेल, असा दावा त्यांनी केला.

Chief Secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती, मनोज सौनिक यांना मुदतवाढ नाही 

खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जो संकल्प केला होता, तो त्यांनी 2023 मध्ये पूर्ण केला आता 2024 मध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. रामलल्ला आता स्वतःच्या घरात विराजमान होणार आहेत. या देशाचं आराध्य दैवत असलेल्या रामाची पूजा आता त्याच्या घरीच होणार आहे. पण आता जे लोक बोंबा मारत आहेत, जेवढे विरोधी पक्ष आहेत, जेवढे विरोधक गर्दी करून उभे आहेत, ते केवळ फोटोसाटी गोळा होत आहेत. ज्यांचा आपसात कुठलाही ताळमेळ नाही, त्यांच्यात एक स्फोट होणार आहे. एकीकडे राम मंदिराचं उ्दघाटन होईल आणि दुसऱ्या बाजूला यांच्या युतीत स्फोट होऊन अनेकजण वेगळे होतील, असं खासदार राणा म्हणाल्या.

‘आधीच्या सरकारमध्ये पाणबुडी काय असते हे ठाऊक नसणारे पर्यटन मंत्री…’; केसरकारंची आदित्य ठाकरेंवर टीका 

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे  पक्ष भाजपला पाठिंबा देतील
तर आमदार रवी राणा म्हणाले, महाविकास आघाडीत सध्या तीन पक्ष आहेत. यातील दोन पक्ष लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत. राममंदिराच्या उद्घाटनानंतर महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी हे प्रभू श्री राम हे मंदिराचं उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटनानंतर तुम्हाला प्रभू राम हे या देशात, महाराष्ट्रात अनेक चमत्कार दाखवतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देतील. वेळ राष्ट्रीय पक्ष म्हणजे कॉंग्रेसच राज्यात शिल्लक राहिल, असा दावा राणा यांनी केला.

तर जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत, पण मनाने आमच्यात आहे. त्यांच्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला.

दरम्यान, महाविकास आघाडीत जागा वाटपावरून सुरू असलेले कलह आणि शिरसाट आणि राणा दांम्पत्याने केलेला दावे पाहता महाविकास आघाडीत फुड पडण्याची शक्यात दिसून येते. त्यामुळं आगामी काळात काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज