युतीत रंगणार कुस्तीचा फड; पालिका निवडणुकांपूर्वीच भाजप महिला नेत्याने टाकला पहिला ‘डाव’

  • Written By: Published:
युतीत रंगणार कुस्तीचा फड; पालिका निवडणुकांपूर्वीच भाजप महिला नेत्याने टाकला पहिला ‘डाव’

Navneet Rana On Amravati Municipal Corporation Election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच लढेल अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील महिला नेत्या नवनीत राणांनी (Navneet Rana) मात्र, निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच एकला चालो रे भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे एकीकडे फडणवीस आगामी काळातील निवडणुका महायुती एकत्रित लढवेल असे सांगत असताना मात्र, दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नेत्यांनी डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. राणांच्या भूमिकेनंतर आता महायुतीत अन्य मित्र पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राणा अमरावतीत भाजपच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.

Video : आयकरचा अधिकारी सांगून थेट भुजबळांवरच टाकलं जाळ; पण.. स्वत:च अडकला, काय घडलं?

काय म्हणाल्या नवनीत राणा? 

अमरावती महानगरपालिका भाजप एकट्याने लढवणार आहे. कोणत्याच पक्षासोबत युती करणार नाही, असं नवनीत राणा यांनी थेट स्पष्ट केलंय. ही घोषणा करून त्यांनी एका प्रकारे या निवडणुकीसाठी रणशिंगच फुंकले आहे. अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर फक्त भगवा आणि भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे, असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय.

भाजप पक्ष घाबरणारा नाही

पुढे उपस्थितांना संबोधित करताना राणा म्हणाल्या की, फार घाबराचं नाही कारण भाजप हा घाबरणारा पक्ष नसून, अमरावती पालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार असून, येथे कुणाशीच युती केली जाणार नाहीये. राणा यांच्या या विधानामुळे पालिका निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी पडण्यास सुरूवात होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. आता राणा यांच्या या विधानानंतर भाजपच्या वरिष्ठांकडून काय प्रतिक्रिया समोर येते हे महत्त्वाचे आहे.

पोलिस अधिकारी, मेव्हुणा आणि ‘ती’ महिला, पुण्यातील दहा एकर जमीन विक्रीचा डाव कसा फसला?

युतीबाबत काय म्हणाले होते फडणवीस?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली होती

पालिका निवडणुकांच्या तोंडावर केंद्राचा मास्टर स्ट्रोक; राज ठाकरेंच्या शिलेदाराची मागणी झटक्यात मान्य

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आम्हाला या निवडणुका महायुती म्हणून लढ्याच्या आहे. काही ठिकाणी अपवादात्मक असलं तर आमच्यामध्ये अंडरस्टँडिंगने काही ठिकाणी वेगळे लढू. निवडणुकीत एकमेकांवर टीका न करता जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र लढणार असून, आमच्यात अंडरस्टँडिंग आहे. वेगळे जरी लढलो तरी आम्ही “पोस्ट पोल” नंतर एकत्र येणारच असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. मात्र, राणा यांच्या या विधानामुळे पालिका निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी पडण्यास सुरूवात होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. आता राणा यांच्या या विधानानंतर भाजपच्या वरिष्ठांकडून काय प्रतिक्रिया समोर येते हे महत्त्वाचे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube