राजकारण बाजूला ठेवून छेडछाड करणाऱ्यांना चौकात फाशी द्या, नवनीत राणा संतापल्या…

राजकारण बाजूला ठेवून छेडछाड करणाऱ्यांना चौकात फाशी द्या, नवनीत राणा संतापल्या…

Navneet Rana : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी रक्षा खडसेंनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान, छेड काढणाऱ्या तरुणांचा तपास सुरु असून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातूनदेखील संताप व्यक्त केला जात आहे. आता माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीदेखील संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

CM फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला ‘चहापान’चा कार्यक्रम, पाहा PHOTO 

नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झाली, व्हिडिओ बनवला, राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. मुलगी कोणाचीही असो, जर असे प्रकार झाले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमचं सरकार कारवाई करण्यामध्ये सक्षम आहे. दुःख एका गोष्टीचं वाटतंय की, छेड काढणारे आरोपी हे एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

पुढं राणा म्हणाल्या की, तुम्ही राजकारण कोणत्याही पातळीवर न्या. पण, असे प्रकार करू नका, माझी हात जोडून विनंती आहेत… राजकारण गेलं खड्ड्यात, जर कोणी राजकीय व्यक्ती असं करत असेल तर भरचौकात आणून त्यांना फाशी द्यावी. जर राजकीय व्यक्तीचं असं कृत्य करत असतील तर हे खूपच निंदनीय गोष्ट आहे. आमचे गृहमंत्री सक्षम आहेत. ते कडक कारवाई करणार आहेत. मुलगी कोणाचीही असो, ती राज्यात सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहील, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

3200 कोटींच्या कामांना ब्रेक दिला का? फडणवीसांना केंद्राचं नाव घेत क्लिअरच केलं… 

डक कारवाई करणार – फडणवीस
दरम्यान, रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी सहा टवाळखोरांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, तसेच खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

रोहिणी खडसेंनी आरोपी अनिकेत भोई आणि पियुष मोरे हे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत, असा दावा केलाय. त्यांनी आरोपी पियुष मोरे यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि आरोपी अनिकेत भोई यांचे चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे फोटोही समोर आणले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube