मी कट्टर हिंदुत्ववादी, गोळ्या खाईल, पण कुराण…; नवनीत राणांकडून हिंदुत्ववादाचा एल्गार

Navneet Rana : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terrorist attack) देशभरात संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्याची चर्चा आहे. यामुळे धार्मिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना पुन्हा एकदा हिंदुत्त्ववादाचा एल्गार केला. आपला लहान मुलगा म्हणतो, आपण गोळ्या खाणार पण कुराण वाचणार नाही, असे नवनीत राणांनी म्हटले.
अमरावतीमधील एका कार्यक्रमात उपस्थिताना संबोधित करताना नवनीत राणा म्हणाल्या, पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून आमच्या बहिणींना धर्म विचारण्यात आला, त्यांना कलमा म्हणण्यास सांगण्यात आलं. पण त्यांना कलमा वाचता आल्या नाही, तेव्हा दहशवाद्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीच्या डोक्यात गोळ्या घातल्या. आमच्या हिंदू भावांनी गोळ्या खालल्या, पण ते कलमा वाचायला तयार झाले नाहीत. पुढं राणा म्हणाल्या की, माझा मुलगा लहान आहे, मी त्याला विचारले की कलम (कुराण) वाचणार का? तर तो म्हणतो की, मी कट्ट्रर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाईल, पण कुराण वाचणार नाही, असे म्हणत राणा यांनी पुन्हा आपण कट्ट्रर हिंदुत्ववादी असल्याचं जाहीर केलं.
Pahalgam Attack: IGNOUतून शिक्षण, मग पाकिस्तान गाठलं, मास्टरमाइंड आदिल हुसैन आहे तरी कोण?
नवनीत राणा म्हणाल्या, पाकिस्तानचे भुट्टो सांगत आहेत, जर सिंधू नदीचे पाणी थांबवले तर त्याच नदीत हिंदूंचे रक्त वाहेल. अरे, अख्ख्या पाकिस्तानमध्ये भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची ताकद नाही. कारण, भारतात एक वाघ आहे, ज्याचे नाव नरेंद्र मोदी, अमित शाह आहे. आता आम्ही फक्त पाणीच नाही तर दाना पण बंद करू, असं त्या म्हणाल्या.
आता फक्त पाणीच बंद केलं, पण उद्या दाणाही बंद केला जाईल. भुट्टोसारख्याला भुट्ट्यासारखं भाजतील, मला मोदीजी आणि अमित शाहांवर पूर्ण विश्वास आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.