Pahalgam Attack: IGNOUतून शिक्षण, मग पाकिस्तान गाठलं, मास्टरमाइंड आदिल हुसैन आहे तरी कोण?

Pahalgam Attack: IGNOUतून शिक्षण, मग पाकिस्तान गाठलं, मास्टरमाइंड आदिल हुसैन आहे तरी कोण?

Pahalgam Attack: २२ एप्रिल रोजी पहलगामजवळील बैसरन येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. यामध्ये २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा समावेश होता. दरम्यान, आदिल हुसैन ठोक (Adil Husain Thokar) हा या दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य योजनाकारांपैकी एक असल्याचे मानले जातंय.

पाणी बंद केल्याचं पत्र दिलंय, पण…; सिंधू करार थांबवल्याबद्दल आंबेडकर काय म्हणाले? 

अनंतनागमधील सरकारी पदवी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर आदिल इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलं. आदिल हुसेन स्पर्धा परीक्षांचीही तयारी करायचाच. सोबतच तो शिक्षक म्हणून पार्टटाइम काम करत असे. आदिलचे मूळ गाव, अनंतनागमधील गुरे असून तिथं सुमारे ४,००० लोक राहतात. आदिलचं कुटुंब साधं जीवन जगते. त्याचा एक भाऊ पेंटरचं काम करतो, दुसरा भाऊ एका ऑटोमोबाईल शोरूममध्ये काम करतो.

आदिला स्वभाव एकलकोंडी होता. पण तो त्याच्या अभ्यासात हुशार होता. त्याचा शेजारी असलेल्या हाफिजने आदिलविषयी बोलताना ही माहिती दिली. दुसरा शेजारी गाजी हा आदिलचं शांत, आदरणीय आणि मेहनती माणूस म्हणून वर्णन करतो.

भारतीय नौदलाचा पाकिस्तानला अलर्ट! पाहा PHOTO 

आदिलचे कुटुंब आणि स्थानिक ग्रामस्थांन सांगतात की, तो २९ एप्रिल २०१८ रोजी परीक्षा देण्यासाठी बदगामला गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. तर गुप्तचर यंत्रणांची माहीत आहे की, आदिल अभ्यास व्हिसावर पाकिस्तानला गेला होता. येथे तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. त्याने पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबाकडून प्रशिक्षण घेतले आणि तो देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाला. दरम्यान, सहा वर्षांनी म्हणजे, २०२४ मध्ये आदिल नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून भारतात परतल्याचे मानले जातंय. आदिला परतला तो 3-4 दहशतवाद्यांसोबत.

आदिलच्या कुटुंबियांचे, विशेषतः त्याची आई शहजादा बानो यांचे म्हणणे आहे की २९ एप्रिल २०१८ पासून आपण आदिलशी बोलले नाही. आदिल त्याची परीक्षा देण्यासाठी बदगामला येथे गेला होता. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. आम्ही तीन दिवसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती, असे शहजादा बानो म्हणाल्या. बानो यांनी आपला मुलगा अशा हल्ल्यात सहभागी असू शकतो हे मान्य केलं नाही. त्या म्हणाल्या, जर आदिल हल्ल्यात सामील असेल तर सैन्य योग्य ती कारवाई करू शकते. तसंच आदिलला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन त्याच्या कुटुंबियांनी केलं. दरम्यान, आदिल आणि साथीदारांचा सध्या सुरक्षा दलाकडून तपास सुरू आहे .

follow us
  • fb
  • instagram
  • youtube