Chief Secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती, मनोज सौनिक यांना मुदतवाढ नाही

  • Written By: Published:
Chief Secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती, मनोज सौनिक यांना मुदतवाढ नाही

Nitin Karir : नितीन करीर (Nitin Karir) यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary) नियुक्ती करण्यात आली आहे. 1988 च्या बॅचचे IAS असलेले नितीन करीर हे सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. ते आजच मनोज सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

‘आधीच्या सरकारमध्ये पाणबुडी काय असते हे ठाऊक नसणारे पर्यटन मंत्री…’; केसरकारंची आदित्य ठाकरेंवर टीका 

सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे आज 31 डिसेंबर 2023 रोजी निवृत्त होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौनिक यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, आता नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने या चर्चा थांबल्या आहेत. करीर यांच्या मुख्य सचिवपदी नियुक्तीची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.

‘आधीच्या सरकारमध्ये पाणबुडी काय असते हे ठाऊक नसणारे पर्यटन मंत्री…’; केसरकारंची आदित्य ठाकरेंवर टीका 

2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करीर यांच्याकडे महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तर त्याआधी करीर यांची राज्य सरकारने 15 मे 2023 रोजी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय त्यांनी पुणे महापालिकेत महापालिका आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. दरम्यान, आता त्यांची करीर यांची मुख्य सचिवपदी निवड झाली असली तरी त्यांचा कार्यकाळ तीन महिन्यांचा असेल. नितीन करीर 31 मार्च 2024 रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर IAS अधिकारी सुजाता सौनिक यांना या पदावर संधी मिळू शकते.

राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्य नितीन करीर यांच्या नावासाठी आग्रह होते. मुख्य सचिवपदासाठी करीर यांना संधी देण्यासाठी काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

यासोबतच पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळ संपल्याने ते आज निवृत्त होत आहेत. त्यामुळे विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार सोपवण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज