Maharashtra New DGP : पोलिस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त; विवेक फणसाळकर यांच्याकडे कार्यभार

Maharashtra New DGP : पोलिस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त; विवेक फणसाळकर यांच्याकडे कार्यभार

Maharashtra New DGP : राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) हे आज 31 डिसेंबर रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Fansalkar) यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

‘2015 मध्ये नीति आयागाचे उपाध्यक्ष आता थेट वित्त आयोगाचे ‘हेड’; कोण आहेत अरविंद पनगरिया?

मागील काही दिवसांपासून केंद्रीय सुरक्षा बलाच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती होणार असल्याचं सांगितलं जात होतं. केंद्रीय आयोगाकडून त्यांना नावाबाबत हिरवा कंदीलही मिळाला पण, रश्मी शुक्ला यांची नियुक्ती न होता आज विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फणसळकर यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात कार्यभार सोपवल्याचंही समोर येत आहे. पुढील आदेश येईपर्यंत फणसळकर यांच्याकडे हा कार्यभार असणार आहे.

चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण हे…;रोहिणी खडसेंकडून शीतल म्हात्रेंचा खास शैलीत समाचार !

रजनीश सेठ यांचा जन्म 29 डिसेंबर 1963 साली झाला. बीए ऑनर्स(LLB) मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते 1988 ला पोलिस दलात दाखल झाले होते. रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. याआधी त्यांनी राज्यात अनेक महत्वाच्या पदांवर कर्तव्य बजावले आहे. ते महाराष्ट्रात फोर्स वनचे प्रमुखही होते.

31st संध्याकाळचे GRAND सेलिब्रेशन! वर्षाचे समापन होणार आणखीनच धमाकेदार..

यासोबतच त्यांनी राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिवपदाचीही जबाबदारी चोख पार पाडली. त्यानंतरच त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच लाचलुचपत प्रतिबंध विभागातही त्यांनी महासंचालकपद एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सांभाळलं होतं. अखेर आज रजनीश सेठ पोलिस महासंचालक पदाच्या सेवेतून निवृत्त होत असून 2021 साली त्यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज