मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक, पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड, आजच स्वीकारला पदभार

मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक,  पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड, आजच स्वीकारला पदभार

Sujata Saunik : सुजाता सौनि (Sujata Saunik) यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. सौनिक या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. राज्याचे सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर (Nitin Karir) यांचा कार्यकाळ आज संपला असून सुजाता सौनिक आजच (दि. 30 जून) आपला पदभार स्वीकारला आहे. सुजाता सौनिक या 1987 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत.

तनपुरे कारखाना बंद पाडणारे पडद्यामागचे सूत्रधार तेच; विखे-कर्डिलेंवर तनपुरेंचे गंभीर आरोप 

नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला. तो कालावधी आज संपत आहे. करीर यांच्या निवृत्तीनंतर मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच लक्ष होतं. अखेर सेवा ज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. सुजाता सौनिक यांनी यापूर्वी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल आणि त्या जून 2025 मध्ये निवृत्त होतील. सौनिक यांनी आज सायंकाळी पाच वाजता नितीन करीर यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला आहे.

‘विधानसभा लढण्याची माझी तयारी, खडकवासल्यातून…’; रुपाली चाकणकरांचे मोठं विधान 

पती आणि पत्नी मुख्य सचिव

सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस आणि मुख्य सचिव अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. याआधी मनोज सौनिक यांनी देखील राज्याच्या मुख्य सचिवपदावर काम केले होतं. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे मुख्य सचिवपदी राहणारे ते पहिलेच पती-पत्नी ठरले आहेत.

सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये झाले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, गृह मंत्रालय विभागाचे सल्लागार सहसचिव या महत्वाच्या पदांवर काम केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube