बीड हादरल! हॉटेलमध्ये बसलेल्या युवकाच्या डोक्यात सपासप वार, तरुणाला जाग्यावरच संपवलं

Beed Crime : बीड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तरुणाची हत्याराने (Beed) वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरातील रायगड नगर येथे घडली आहे. अविनाश शंकर देवकर (वय ३५) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. येथील साखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे हा सगळा प्रकार घडला.
आज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अविनाश देवकर यांचा मृतदेह स्वाराती रुग्णालयात आणण्यात आलं असून पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत. या घटनेने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे.
वक्तव्यांवर संयम ठेवा! मंत्री विखे पाटलांचा मनोज जरांगेंना सल्ला…
अज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने अचानकपणे सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाला. यावेळी घडलेली घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली, ही माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र, मयत अविनाश देवकर याचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्याचं समोर येत आहे.
अविनाश देवकर यांचा मृतदेह स्वाराती रुग्णालयात आणण्यात आला असून पोलीस आरोपीच्या शोधत असताना सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतलं असल्याचे सांगण्यात आलं आहे. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत असल्याचं संबंधित पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.