Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच घेतला गळफास, पोलिसांनी न्यायाधीशांनाच केले आरोपीच्या पिंजऱ्यात उभे, नेमकं प्रकरण काय?

Beed Crime : दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील वडवणी येथील सत्र न्यायालयात (Vadwani Sessions Court) एक धक्कादायक घटना घडली होती. सरकारी वकील विनायक चंदेल (Vinayak Chandel) यांनी न्यायालय परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणात दोन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. वडवणी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रफिक शेख (Judge Rafiq Sheikh) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jabrat : मराठी रुपेरी पडद्यावर ‘जब्राट’ ; ‘या’ दिवशी होणार रिलीज
ही घटना गुरुवारी (21 ऑगस्ट 2025) दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विनायक चंदेल यांनी चक्क न्यायालयातच सत्काराच्या शालीने गळफास घेतला होता. ते गेल्या अनेक वर्षांपासून वडवणी न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु काही सूत्रांनुसार, न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याकडून विनायक यांना वारंवार त्रास दिला जात होता. त्यामुळेच, त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी चंदेल कुटुंबाने केली आहे.
Bihar Election 2025 : निवडणूक आयोगाला धक्का, SIR प्रक्रियेसाठी आधार कार्ड वैध
विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजित यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, न्यायाधीश रफीक शेख आणि लिपीक आण्णासाहेब तायडे हे त्यांना विनाकारण मानसिक त्रास देत होते. त्यातूनच विनायक चंदेल यांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं विश्वजित यांनी फिर्यादीत म्हटलं.
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात पोलिसांना चंदेल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत न्यायाधीश रफिक शेख यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी न्यायाधीश शेख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी शेख यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे वडवणी परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिक वकील संघटनेने या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला असून, लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येईल.