बीड कारागृहात मोठा राडा! गांजा वाटपावरून पोलिसांना धमक्या, खोक्या भोसलेसह तिघांवर कारवाई

बीड कारागृहात मोठा राडा! गांजा वाटपावरून पोलिसांना धमक्या, खोक्या भोसलेसह तिघांवर कारवाई

Ganja Rada In Beed Jail : बीड जिल्हा कारागृह (Beed Crime) सध्या एक नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सदस्य सध्या या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अलीकडेच, अज्ञात व्यक्तीने कारागृहात गांजा (Ganja Rada) भरलेला चेंडू फेकला, ज्यामुळे चार न्यायाधीन बंदिवानांमध्ये जोरदार वाद (Khokya Bhosale) झाला. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून चेंडू ताब्यात घेतला. त्यानंतर, बंदिवानांनी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा गोंधळ घातला.

‘अरण्य’ मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी; लक्षवेधक मोशन पोस्टर प्रदर्शित

खोक्या भोसलेच्या अडचणी वाढल्या

या प्रकरणी कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना (Police) माहिती दिली. पोलीस आणि जिल्हाप्रशासनाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, ज्यात गांजा बंदिवानांनीच मागितल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी खोक्या भोसलेसह तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोक्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती, त्याला जामीन मिळाला होता. आता या नव्या (Beed News) कारनाम्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

खुशखबर! आज 30 लाख शेतकऱ्यांना मिळणार 3200 कोटी रुपये, सरकार का वाटतंय पैसे? घ्या जाणून…

बीड जिल्हा कारागृहात गांजा

यापूर्वी, बीड जिल्हा कारागृहात गांजा आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज यांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षय ऊर्फ चिंटू मिठ्ठू गायकवाडची झडती घेतली (Crime News) असता, त्याच्या अंडरविअरमध्ये रबरी, फिकट आकाशी रंगाचा चिरलेला बॉल आढळून आला. त्या बॉलमध्ये गांजासदृश अंमली पदार्थ आढळला. त्यानंतर, त्याच्या पँटच्या खिशातही झडती घेतली असता, हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट पदार्थ, हिरवट रंगाची फुले, बिया, बोंडे आणि काड्यांसह अंमली पदार्थसदृश मुद्देमाल सापडला. या प्रकरणी अक्षय गायकवाडविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या सर्व घटनांमुळे बीड जिल्हा कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारागृह प्रशासनाने या प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube