लेट्सअप विश्लेषण : शिवतारे खरंच बारामतीमधून लढणार की, केवळ पोकळ आव्हान?
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते…अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. ही वाक्य आहेत 2019 च्या विधानसभेपूर्वीची आणि ती पण अजितदादांनी शिवतारेंना दिलेल्या कडक शब्दातील आव्हानाची. त्यानंतर आता शिवतारेंनी 2019 च्या निवडणुकांमध्ये थेट आव्हान देत पराभूत करणाऱ्या अजितदादांना बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसून, आता गुलामगिरी नव्हे तर, बदला घ्यायची वेळ आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवतारे खरंच बारामतीमधून लोकसभा लढणार की, केवळ पोकळ आव्हानं देत आहेत असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. नेमकं 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय झालं होतं. अजितदादांनी का शिवतारेंचा एवढा राग आला होता हेच आपण जाणून घेऊया. (Its Time To Take Revenge Says Purandar Assembly Constituency MLA Vijay Shivtare)
Electoral Bonds : खटले जिंकून देणाऱ्या साळवेंचा युक्तिवाद कुचकामी; सुप्रीम कोर्टाने उडवल्या चिंधड्या
येत्या काही दिवसात राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुलं वाजणार असून, सगळ्यांचं लक्ष लागले आहे ते शरद पवारांच्या बारामतीकडे. आगामी लोकसभेसाठी बारामतीमध्ये मविआकडून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसून, आता गुलामगिरी नव्हे तर, बदला घ्यायची वेळ आल्याचे म्हटले आहे. शिवतारेंच्या याच विधानामुळे बारामतीच्या मैदानात तिसरा उमेदवार उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
2019 चा पराभव शिवतारेंच्या जिव्हारी
विजय शिवतारे हे शिंदेंच्या शिवसेनेत येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. मात्र, नंतर त्यांनी घड्याळाची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. सेनेत दाखल होताच शिवतारेंनी राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांवर जोरदार शाब्दिक टीका करण्यास सुरूवात केली होती. शिवतारेंच्या या भूमिकेमुळे अजितदादांनी आक्रमक पवित्रा घेत “तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर, मी कुणाच्या बापाला ऐकत नाही.” असे थेट आव्हान शिवतारेंनी दिले होते.
विजयबापू शिवतारेंना सतत दमात घेणारे ‘अजितदादा’ आता शांत का?
त्यानंतर पार पडलेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी त्यांचा शब्द खरा ठरवला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारेंचा 25 हजार मतांनी पराभव केला होता. हा पराभव शिवतारेंच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. आता त्याचाच वचपा काढण्यासाठी शिवतारेंनी आक्रमक पवित्रा घेत बारामतीमधून लोकसभा लढवत अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
पवारांच्या विरोधात पाच लाखांहून अधिक मतदार
शिवतारे हे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून येतात. शिवसेना-भाजपा- राष्ट्रवादीमध्ये सध्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. तिन्ही पक्षांचे नेते आपलाच दावा असल्याचे सांगत आहेत. विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय घेणार नाही असे म्हणत शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असल्याचा दावा शिवतारेंनी केला आहे. या दाव्यामुळे अजित पवारांची धाकधूक काहीशी वाढल्याचे बोलले जात आहे.
ठाकरेंना दहा कोटी देऊन ओमराजेंना तिकीट मिळवून दिले; तानाजी सावंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट
खात्री देणार असाल तरचं…
जेव्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो तेव्हाची परिस्थीती वेगळी होती. आमचे पक्ष वेगवेगळे होते. आम्ही राजकीय विरोधक होतो. पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे एकमेकांच्या पसंतीचा विचार केला नाही, कामे केली नाही तर, नेत्यांनी सांगितले तरी लोक ऐकतील अशी परिस्थिती नाही, त्यामुळे विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू, अशी सर्वच मतदारसंघांमध्ये प्रत्येकाची भूमिका असल्याचेही शिवतारेंनी म्हटले होते. त्यानंतर आता शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसून, आता गुलामगिरी नव्हे तर, बदला घ्यायची वेळ आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार विरूद्ध विजय शिवतारे अशी तिहेरी लढत होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.