Jitendra Aawhad : पक्षासाठी अजित पवारांनी काहीही केलेलं नाही; सुनावणी दरम्यान आव्हाडांनी केले आरोप
Jitendra Aawhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Aawhad ) यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. आता हा वाद निवडणूक आयोगासमोर असून सुनावणी सुरू आहे. आता आज निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली.
पक्षासाठी अजित पवारांनी काहीही केलेलं नाही…
राष्ट्रवादीच्या पक्ष अन् चिन्हावरील सुनावणी सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अजित पवार यांनी पक्षाचं कोणतंही पद उपभोगलेलं नाही. त्यामुळे त्यांनी पक्षासाठी कोणतेही योगदान दिलेलं नाही. तर राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांनी रक्त आटवून वाढवलाय. त्यामुळे एका मुलाला मोठं करण्यात वडिलांचे जेवढे योगदान असतं. तेच योगदान राष्ट्रवादीसाठी शरद पवारांचं आहे. मात्र अजित पवारांनी कधीही कोणतही पद पक्षाचं उपभोगलेले नाही. त्यांचं पक्षासाठी काहीही योगदान नाही. असा आरोप आव्हाड यांनी अजित पवारांवर केला आहे.
वेगवान गोलंदाज नवदीप सैनी अडकला विवाह बंधनात, पाहा फोटो
त्याचबरोबर यावेळी आव्हाड असंही म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर वादविवाद सुरू आहे. यावेळी कायदेशीर बाजू मांडत असताना त्यांनी ब्रह्मानंद रेड्डी विरुद्ध इंदिरा गांधी यांच्या 1978 च्या केसचा दाखला दिला. त्यामध्ये त्यांनी वाद हा एका दिवसामध्ये घडत नसतो. तो अनेक बैठका संवाद यामधून होत असतो. तो अचानक एका रात्रीतून समोर येत नसतो. त्यामुळे शरद पवारांना पक्षाचे अध्यक्ष करण्याचे निवडणूक असो किंवा पक्षातून बाहेर पडण्याच्या महिनाभर आधीपासून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना पाठिंबा देत होते.
Covid Scam : ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
त्यावेळी निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणाऱ्या पत्रांमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर कोणताही आक्षेप घेतला नाही. ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी हे काम पाहतात. तसेच एका रात्रीमध्ये नवरा बायकोला देखील घटस्फोट मिळत नाही त्यासाठी देखील सातत्याने लढा द्यावा लागतो. त्यामुळे जर अजित पवार हे शरद पवार यांना राजीनामा दिल्यानंतर देखील पुन्हा पक्षाचे अध्यक्ष करण्याच्या समिती मध्ये देखील होते. बाकी आत्ताच्या मंत्र्यांनी देखील त्याला पाठिंबा दिला होता त्यामुळे वाद हा पक्षाचा नाहीये तर सत्तेचा आहे. अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर ताशेरे ओढले आहेत.