Covid Scam : ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

  • Written By: Published:
Covid Scam : ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई – कोरोनाच्या काळात (Covid Scam) मुंबईतील ऑक्सिजन जनरेशन प्लांट स्कॅम प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई केली. महापालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंत्राटदार रोमीन छेडा याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offenses Branch) या छेडाची 8 तास चौकशी केली. काम पूर्ण झाली नसतांनाही ती पूर्ण झाल्याची भासवून सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा मेसर्स हायवे कंपनीच्या रोमिन छेडावर (Romin Chheda) करण्यात आला.

‘या’ बॅंकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; आरबीआयकडून 12 महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त 

आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी रात्री नागपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी छेडासह संबंधित पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेंग्विन कंत्राटामुळे वादग्रस्त ठरलेल्या मेसर्स हायवे कंपनीला पात्रता नसतानाही नऊ महापालिका रुग्णालये आणि एका जंबो कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आले होते. कंपनीने निर्धारित वेळेत काम पूर्ण केले नाही. मात्र, हे काम 2021 मध्ये पूर्ण झाल्याचं दाखवून 6 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. रोमिन छेडा आदित्य ठाकरेंचे निकवर्तीय असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

पगार मागितला म्हणून तरुणाला मारहाण, तोंडात चप्पल कोंबली; महिला बॉस बनली ‘लेडी डॉन’ 

मुंबई पोलिसांनी एफआयरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या व्ही.एन. देसाई हॉस्पिटल, बीडीबीए हॉस्पिटल, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन हॉस्पिटलचे 30 दिवसांत ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट रोमिन छेडा यांच्याशी संबंधित हायवे बांधकाम कंपनीला देण्यात आले होते.

हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी ही उत्तर प्रदेशातील कंपनी आहे. हा करार कोणत्याही अनुभवाशिवाय आणि नियमांचे पालन न करता केल्या गेला. मात्र, या कंपनीने दिलेल्या मुदतीत काम काम पूर्ण केले नाही. त्यानंतर सन 2021 कंपनीनं ऑक्सीजन प्लांटचं काम पूर्ण झाल्याचं दाखवलं आणि महापालिकेची तब्बल 6 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

त्यासाठी बनावट पत्राचा वापर केल्याचंही एफआयआरमध्ये नमूद आहे. ही कंपनी ठाकरे कुटुंबीयांच्या जवळची असल्याने या कंपनीला कंत्राट दिले जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा संबंधितांचा लेखोजोखा तपास करत आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखा कोरोनाच्या काळात झालेल्या विविध घोटाळ्यांसंदर्भात गुन्हे नोंदवत तपास सुरू केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube