Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपात येण्याची तयारी? महाजनांनी स्पष्टच सांगितलं

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपात येण्याची तयारी? महाजनांनी स्पष्टच सांगितलं

Eknath Khadse : आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाने (Lok Sabha Election) सुरू केली आहे. निवडणुकीत मोठा विजय साकारण्यासाठी नवीन मित्रांची शोधाशोध आणि अन्य पक्षांतील नेत्यांचं स्वागत केलं जात आहे. बाहेरुन आलेल्या नेत्यांचे थेट भाजपात किंवा सहकारी पक्षांत पुनर्वसन केले जात आहे. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. त्यानंतर आजच ते भाजपात प्रवेश करतील अशी बातमी आली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरवापसीच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार का, याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाष्य केले आहे.

Eknath Khadase : महाजन डिस्टर्ब झाले आहेत; ‘ते’ फोटो समोर आणल्यानंतर खडसेंचा पुन्हा निशाणा

गिरीश महाजन यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चांवर स्पष्ट उत्तर दिले. एकनाथ खडसे भाजपात परतण्यासाठी फार जोर लावत आहेत अशी माहिती मला कळाली आहे. पण पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत अजून तरी विचारणा झालेली नाही. मला वाटतं तसं काही प्रयोजन नाही. मला अजून तरी एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात घ्यायचे की नाही याबाबत कुणीही विचारलेले नाही. मी एक लहान कार्यकर्ता आहे. एकनाथ खडसे यांची कदाचित थेट वरून हॉटलाइन असेल तर त्यांनी लावावी, असे महाजन म्हणाले.

दरम्यान, भाजपामधील घरवापसीबाबत एकनाथ खडसे यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली होती. भाजपात माझा खूप छळ करण्यात आला त्यामुळे आता पुन्हा भाजपात जाण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही, असे खडसे म्हणाले होते. विनोद तावडे सध्या पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तावडे आणि माझे आजही चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते कदाचित तसा प्रयत्न करत असावेत, असे खडसे यांनी स्पष्ट केले होते.

वादग्रस्त विषय टाळाच! एकनाथ खडसेंनी भर शिबिरातच आव्हाडांचे कान टोचले

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतण्याची तयारी करत आहेत. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी अजून ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यामुळे खडसेंचा पक्षप्रवेश रखडल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून खडसे राज्याच्या राजकारणातून गायब झाले आहेत. आधीप्रमाणे पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडतानाही ते दिसत नाहीत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय अजित पवार यांच्या बाजूने दिल्यापासून खडसे राजकारणातून गायब झाल्याचे दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज