Eknath Khadase : महाजन डिस्टर्ब झाले आहेत; ‘ते’ फोटो समोर आणल्यानंतर खडसेंचा पुन्हा निशाणा
Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये पुन्हा एक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामध्ये आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा महाजनांवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना गिरीश महाजनांच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर खडसे म्हणाले की, गिरीश महाजनांचीच मानसिक स्थिती बिघडलेली आहे. अशी टीका खडसेंनी केली आहे. सध्या मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार वादंग सुरु आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
मी माध्यमानसमोर बसलेलो आहे. त्यामुळे माझी मानसिक स्थिती खराब आहे की, चांगली आहे हे तुम्हीच ठरवा. मी नाही मात्र गिरीश महाजन यांचीच मानसिक स्थिती बिघडलेली आहे. कारण मी त्यांना जे प्रश्न वारंवार विचारत आहे. त्याचे उत्तरं देखील ते देऊ शकत नाहीत. त्यांनी माझ्या आजारपणाबाबत आरोप केले होते की, मी आजारी असल्याचे नाटक करत आहे, त्यानंतर मी त्यांना आव्हान दिलं होतं की, माझा आजार पण खोटा आहे हे सिद्ध करा आणि खोटं असल्यास मला जोड्याने मारा.
शाहरुखची पत्नी गौरीकडून 30 कोटींचा गंडा? ईडीने धाडली नोटीस
त्याचबरोबर तसं नसल्यास तुम्ही जोडे मारायला तयार राहा. मात्र अजूनही ते आलेले नाहीत. त्यामुळे केवळ बडबड करत राहायची. तसेच महाजन एका सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा आहे. जे जामनेर शहरांमध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. मात्र गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्याकडे एवढी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता कशी आली? त्याची चौकशी करण्यात यावी. मात्र ते चौकशी करणार नाही. मी त्यांच्या अनेक गैरव्यवहार समोर आणले आहेत. मात्र त्यावर सरकारकडून उत्तर दिले जात नाही. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
जरांगेंच्या डेडलाईनला केराची टोपली! मराठा आरक्षणाचा निर्णय फेब्रुवारीत; CM शिंदेंची मोठी घोषणा
दरम्यान खडसे गिरीश महाजन यांच्यावर सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी सभागृहात केली आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत फोटो दाखवत महाजनांवर दशतवाद विरोधी गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी केली. यावेळी एकनाथ खडसे यांनी त्या लग्नातील काही फोटो सभागृहात दाखवले. यानंतर काही वेळ सभागृहात गोंधळ उडाला. ते पुढं म्हणाले देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे महाजानांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावं. जर बडगुजर यांचं नाव घेतलं जातं तर मग गिरीश महाजन यांचे नाव घ्यायचं नाही का? असा हल्लाबोल खडसे यांनी केला.
या प्रकरणात एसआयटी चौकशी स्थापन करण्याचे आदेश उपसभापती निलम गोऱ्हेंनी द्यावेत. बॉम्ब स्फोटाशी संबंधित गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ कारवाई करत सरकारने राजीनामा घ्या, अशी मागणी खडसे यांनी केली.दरम्यान, गिरीश महाजन यांच्यावरील आरोप खोटे असून विरोधकांनी आरोप केल्याप्रकरणी माफी मागावी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं आहे. नाशिकमधील मुस्लिम धर्माचे मोठे धर्मगुरु शेर ए खातिम यांच्या पुतण्याचं लग्न होतं. पण त्या दोन्ही कुटुंबाचे दाऊदशी संबंध नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.