दाऊदच्या हस्तकाशी गिरीश महाजनांचे संबंध, खडसेंनी दाखवले सभागृहात फोटो
Eknath Khadse : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Daud Ibrahim) हस्तक सलीम कुत्ता याच्यावरुन विधीमंडळात जोरदार खडजंगी सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत फोटो दाखवत महाजनांवर दशतवाद विरोधी गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी केली.
2017 मध्ये नाशिकमध्ये दाऊद इब्राहिम याचा हस्तक सलीम कुत्ता याच्या नातेवाईकांच्या लग्नात गिरीश महाजन यांच्यासह एका पक्षाचे आमदार आणि नगरसेवक उपस्थित होते. गिरीश महाजन यांचे इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता यांच्याशी संबंध असल्याने या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
यावेळी एकनाथ खडसे यांनी त्या लग्नातील काही फोटो सभागृहात दाखवले. यानंतर काही वेळ सभागृहात गोंधळ उडाला. ते पुढं म्हणाले देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे महाजानांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावं. जर बडगुजर यांचं नाव घेतलं जातं तर मग गिरीश महाजन यांचे नाव घ्यायचं नाही का? असा हल्लाबोल खडसे यांनी केला.
Giriraj Singh : हिंदुंनो हलाल नाही तर झटका मटणच खा! केंद्रीय मंत्र्यांनी दिला सल्ला
या प्रकरणात एसआयटी चौकशी स्थापन करण्याचे आदेश उपसभापती निलम गोऱ्हेंनी द्यावेत. बॉम्ब स्फोटाशी संबंधित गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ कारवाई करत सरकारने राजीनामा घ्या, अशी मागणी खडसे यांनी केली.
सलिम कुत्ता प्रकरणात महाजनांचा संबंध नाही; फडणवीसांकडून महाजनांना थेट क्लिन चिट
दरम्यान, गिरीश महाजन यांच्यावरील आरोप खोटे असून विरोधकांनी आरोप केल्याप्रकरणी माफी मागावी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं आहे. नाशिकमधील मुस्लिम धर्माचे मोठे धर्मगुरु शेर ए खातिम यांच्या पुतण्याचं लग्न होतं. पण त्या दोन्ही कुटुंबाचे दाऊदशी संबंध नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.