सलिम कुत्ता प्रकरणात महाजनांचा संबंध नाही; फडणवीसांकडून महाजनांना थेट क्लिन चिट

सलिम कुत्ता प्रकरणात महाजनांचा संबंध नाही; फडणवीसांकडून महाजनांना थेट क्लिन चिट

Devendra Fadnvis : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावरील आरोप खोटे असून सलिम कुत्ता प्रकरणात गिरीश महाजनांचा कुठलाचं संबंध नसल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजनांना थेट क्लिन चीट दिली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे गॅंगस्टर सलिम कुत्तासोबतचे व्हिडिओ दाखवल्यानंतर विरोधकांनीही सलिम कुत्तासोबत गिरीश महाजनांचे व्हिडिओ दाखवले आहेत. या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत माफी मागण्यास सांगितलं आहे.

CM Shinde : गडचिरोलीतील नक्षल पिडीत, शरणार्थींसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय!

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिकमधील मुस्लिम धर्माचे मोठे धर्मगुरु शेर ए खातिम यांच्या पुतण्याचं लग्न होतं. या लग्नाला पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन होते. गिरीश महजानांसोबत सर्वच पक्षाचे नेते गेले होते. शेर ए खातिम यांचं दाऊदशी कोणताही संबंध नाही. ज्या मुलीसोबत पुतण्याचं लग्न झालं, त्या मुलीच्या वडिलांचं जे सासर आहे तिकडच्या एका मुलीचं दाऊदच्या कोणत्यातरी भावाशी लग्न झालंय असा आरोप करण्यात आलायं, मात्र, ज्यांच्याशी लग्न झालं त्या परिवाराचा दाऊदशी कुठलाही संबंध नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

Dawood Ibrahim : बॉम्बस्फोट, टार्गेट किलिंग अन्…; दाऊदने भारतात कोण कोणते गुन्हे केले?

तसेच कुठलाही गुन्हा शेर ऐ खातिम यांच्यासह ज्यांच्यासोबत विवाह झाला त्यांच्यावर नाही. मी २०१७-18 साली चौकशी समिती नेमली होती. त्यावेळी शेर ए खतिम यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही असा अहवाल समितीकडून देण्यात आला होता. एका मंत्र्यावर असा आरोप करताना त्याची खातरजमा न करता त्याची चौकशी आधीही झाली, असे लोकं जेव्हा बडगुजर नाचतात तेव्हा दाखवत नाहीत. एकतर कुठलाही संबंध नाही पण एका मंत्र्यावर असा आरोप केल्याप्रकरणी विरोधकांनी माफी मागितली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे आणि मंत्री दादा भुसेंनी यांनी केला होता. याच मुद्दावरून गेले दोन दिवस भाजप आणि ठाकरे गटांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान, आज भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता… सलीम कुत्ता, अशी नारेबाजी विधानभवन परिसरात केली. विधानपरिषदेतही सलीम कुत्ता प्रकरणावरून जोरदार खडाजंगी झाली.

Year Ender 2023: बॉलीवूडचे ‘हे’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठरले फ्लॉप अन् ओटीटीवर हिट! भाईजानसह खिलाडीचा यादीत समावेश

सलीम कुत्ता प्रकरणात भाजपकडून ठाकरे गटावर टीका केली जात असतांना आता एकनाथ खडसेंसह, अनिल परब, अंबादास दानवे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाना साधला. आज विधानपरिषेद खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे सलीम कुत्ता यांच्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. खडसेंनी महाजन आणि कुत्ता यांचा फोटो विधानपरिषदेत दाखवून खळबळ उडवून दिली.

महाजन यांचीही चौकशी व्हावी : खडसे
गिरीश महाजन यांचा सलीम कुत्ताशी संबंध आहे. त्यामुळे त्यांच्यावर दहशतवादविरोधी गुन्हा दाखल करण्यात यावा. मंत्री महाजन आणि कुत्ता यांचा फोटो समोर आला आहे. बडगुजर यांचं नाव घेतले तर गिरीश महाजन यांचे नाव का नाही? बडगुजर यांच्या चौकशीबरोबरच महाजन यांचीही चौकशी व्हावी, त्याचं सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तातडीने या प्रकरणाच्या एसआयटी तपासाचे आदेश द्यावेत, असंही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube