Girish Mahajan : ‘मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री स्वत:..; गिरीश महाजनांचं मोठं विधान

Girish Mahajan : ‘मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री स्वत:..; गिरीश महाजनांचं मोठं विधान

Girish Mahajan Speak on Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत असल्याचं विधान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचं हत्यार उपसल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता गिरीश महाजनांच्या विधानामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं बोललं जात आहे.

Tiger 3: भाईजान अन् कतरिनाचा जलवा; टायगर 3 मधील गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती

गिरीश महाजन म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही प्लॅन ठरलेला नाही. मी प्लॅन ठरविणारा कोण? मराठा आरक्षण संदर्भात आम्ही सरकार म्हणून निश्चितच सकारात्मक आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं असून तात्पुरता स्वरूपाच आरक्षण आम्हाला द्यायचं नसल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या इशाऱ्यानंतर भाजप अलर्ट; महाजन म्हणाले, त्यांचं वक्तव्य…

मराठा आरक्षणाला टिकणारं आरक्षण द्यायचं म्हणूनच आम्ही आरक्षणासंदर्भातील सर्वच गोष्टी तपासून, सलाखून करत आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणासंदर्भात स्वतः लक्ष घालत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भीष्म प्रतिज्ञा घेतली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर विश्वास हा ठेवलाच पाहिजे, असंही महाजनांनी सांगितलंयं.

Vladimir Putin : पुतिन एकदम फिट अँड फाईन; हार्टअटॅकच्या केवळ अफवा, क्रेमिनिलचा दावा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. सरकारला मुदत देऊनही काहीच झाले नसल्याने त्यांनी यावेळी आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत काल (24 ऑक्टोबर) संपली.

Gujarat Bridge Collapse : मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; 2 जण ठार

यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आधी 17 दिवसांचे उपोषण केले, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांच्या शब्दानंतर आपण 40 दिवसांची मुदत दिली. पण या काळात त्यांनी आरक्षण दिले नाही. आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवला, मग आमचं काय चुकलं? आमच्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना आरक्षण आहे, पण आम्हालाच आरक्षणापासून डावललं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

दिल्लीवरुन निर्णयच घेऊन या…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपच्या हाय कमांड नेत्यांशी सविस्तरपणे चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता शिंदे-फडणवीसांनी मराठा आरक्षण देण्याचा निर्णयच घेऊन राज्यात यावं, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube