WTC फायनल इंग्लंड की भारतात? BCCI च्या गुगलीने पेच वाढला; आयसीसी काय निर्णय घेणार..

WTC फायनल इंग्लंड की भारतात? BCCI च्या गुगलीने पेच वाढला; आयसीसी काय निर्णय घेणार..

Cricket News :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचे दोन फायनल सामने इंग्लंडमध्ये आयोजित झाले आहेत. तिसरा फायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामनाही इंग्लंडमध्येच होणार आहे. यातच आता मोठी माहिती हाती आली आहे. बीसीसीआयने पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आयोजित करण्यासाठी दावेदारी केली आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार 2025-2027 WTC सायकलचा अंतिम सामना बीसीसीआय भारतात आयोजित करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी अर्जही केला आहे. या मुद्द्यावर मागील महिन्यात आयसीसी चीफ एक्झिक्युटिव्ह कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली होती. यावेळी फायनल सामना आयोजित करण्याची इच्छा भारताने व्यक्त केली होती.

इंग्लंडच्या मीडियात काय चाललंय

इंग्लंडमधील द गार्डियन वृत्तपत्रानुसार भारत 2027 फायनल आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. झिम्बाब्वेत झालेल्या बैठकीत हा मुद्दा पुढे आला. या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व अरुण सिंह धुमल करत होते. आयसीसी चीफ जय शाह (Jay Shah) हेही या बैठकीला उपस्थित होते.

ब्रेकिंग : IPL 2025 स्थगित; भारत-पाकिस्तान तणावादरम्यान BCCI चा मोठा निर्णय

दोन फायनलमध्ये भारताचा पराभव

टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात दोनदा एन्ट्री घेतली. परंतु, या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पहिला फायनल सामना इंग्लंडच्या हँपशायर येथे झाला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. दुसरा फायनल सामना ओवल मैदानावर झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. तिसरा फायनल सामना 11 जून रोजी लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे की यावर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जावा. जर भारताव्यतिरिक्त दुसरा एखादा संघ फायनलमध्ये पोहोचला तर तिकीट विक्री होणे कठीण होईल. इंग्लंडमध्ये सामने नेहमीच हाउसफुल होत असतात. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे सुरुवातीच्या चार दिवसांचे सर्व तिकीट विकले गेले आहेत. अशा परिस्थितीत आयसीसी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मोठी बातमी! IPL 2025 पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube