Team England : टीम इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा

Team England : टीम इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा

मुंबई : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी येत आहे. वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं तडकाफडकी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. तिन्ही फॉरमॅटमधून त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. (IPL) आयपीएलच्या गेल्या हंगामातही तो अनसोल्ड राहिला होता. आता अचानक त्याने निवृत्तीची (retirement ) घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.

2019 चा विश्वचषक इंग्लंडला जिंकून देणाऱ्या इयोन मॉर्गनने (Eoin Morgan) क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इयोन मॉर्गनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. (England Cricket Team ) त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत असल्याचा अभिमान वाटतो. (Cricket) मी खूप विचारविनिमय केल्यानंतर, मला विश्वास आहे की, ज्या खेळाने मला खूप आनंद दिला आहे, त्यापासून दूर जाण्याची हीच योग्य वेळ आहे. जगाने मला खूप काही दिले आहे. 2005 मध्ये मिडलसेक्समध्ये सामील होण्यासाठी इंग्लंडला जाण्यापासून, SA20 मध्ये पार्ल रॉयल्सकडून खेळण्यापर्यंत, मी प्रत्येक क्षणाची कदर केली.

तो पुढे भावूकपणे म्हणाला, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत जसे चढ-उतार येत असतात, पण या काळात माझे कुटुंब आणि मित्र माझ्यासोबत आहेत. मी माझी पत्नी तारा, माझे कुटुंब आणि जवळच्या मित्रांचे विशेष आभार मानू इच्छितो. ज्या मित्रांनी मला कायम साथ दिली. इंग्लंडचा माजी कर्णधार पुढे म्हणाला, मी माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, चाहते आणि पडद्यामागील लोकांचे आभार मानले पाहिजेत, ज्यांनी मला केवळ मी बनलेला खेळाडूच नाही तर मी एक व्यक्ती बनवले आहे. मी आज जो आहे तो मी तुमच्यामुळे आहे. धन्यवाद. क्रिकेटमुळे मी जगभर फिरू शकलो.

मॉर्गनने इंग्लंडकडून 16 कसोटी, 248 एकदिवसीय आणि 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 30.43 च्या सरासरीने 700 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.29 च्या सरासरीने आणि 91.16 च्या स्ट्राइक रेटने 7,701 धावा केल्या आहेत ज्यात 14 शतके आणि 47 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, मॉर्गनने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 28.58 च्या सरासरीने 2,458 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 14 अर्धशतके आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube