पाकिस्तानची नवी चाल! विश्वकप स्पर्धेसाठी टीम भारतात पाठवणार नाही; नेमकं काय घडलं?

Pakistan Will Not Travel India Womens World Cup 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठी (Pakistan Cricket Board) घोषणा केली आहे. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार नाही. या वर्ल्डकप स्पर्धा भारतात आयोजित केल्या (Women’s World Cup 2025) जाणार आहेत. परंतु, पाकिस्तान बोर्डाने भारतात संघ पाठवणार नसल्याचे म्हटले आहे. महिला वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 8 टीम असतील. ही स्पर्धा 29 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
भारतात का येणार नाही याचे उत्तरही पाकिस्तान बोर्डाने दिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत (Champions Trophy 2025) भारताचा संघ पाकिस्तानात गेला नव्हता. त्यामुळ आता आम्ही महिला क्रिकेट संघ (Pakistan Women’s Cricket Team) भारतात पाठवणार नाही अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवरुन वाद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पाकिस्तान संघ विश्वचषकासाठी पात्र अन् बीसीसीआयचं वाढणार टेन्शन; जाणून घ्या कारण
पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी सांगितले की भारतीय संघ (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आला नव्हता. तटस्थ ठीकाणी सामने खेळण्याची परवानगी या संघाला देण्यात आली होती. याच पद्धतीने आता पाकिस्तान टीमसाठी जे तटस्थ ठिकाण निवडले जाईल तेथे टीम पाठवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) डोकेदुखी मात्र वाढणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या महिला संघाने महिला विश्वकप स्पर्धेसाठी क्वालिफाय केले आहे. वर्ल्डकप क्वालीफायर टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानने सर्व पाच सामने जिंकून स्पर्धेसाठी क्वालीफाय केले. आता जर पाकिस्तानचा संघ भारतात आला नाही तर बीसीसीआयला पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करावे लागतील. परंतु, याबाबत अजून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आयसीसीची कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. या दोन्ही संस्थांकडून काय प्रतिक्रिया येते यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. पाकिस्तान बोर्डावर भारतात येऊन खेळण्याची सक्ती केली जाते का हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.
ICC कडून सौरव गांगुलीला मानाचं पान; क्रिकेट समितीची धुरा दादाच्या हाती..