मोठी बातमी! कपिल शर्मासह ‘या’ सेलिब्रिटींना पाकिस्तानातून धमकीचा मेल, ‘जर 8 तासांत…’

मोठी बातमी! कपिल शर्मासह ‘या’ सेलिब्रिटींना पाकिस्तानातून धमकीचा मेल, ‘जर 8 तासांत…’

Bollywood Celebrities Got Threat Mail From Pakistan : भारतीय सेलिब्रिटींना (Bollywood Celebrities) जीवे मारण्याच्या धमक्यांची मालिका थांबतच नाही आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या स्टारला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. नुकतंच प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला देखील जीवे मारण्याच्या धमकीला मेल प्राप्त झालाय. धमकीच्या ईमेलमध्ये कपिल शर्माशी (Kapil Sharma) संबंधित लोक, त्याचे नातेवाईक आणि जवळपास राहणाऱ्या लोकांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. याशिवाय अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav), कोरिओग्राफर रेमो डिसूझा (Remo Dsouza) आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) यांना धमकीचे ईमेल आलेत.

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा आणि राजपाल यादव यांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. हा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. या दोन स्टार्सशिवाय सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांनाही धमक्या (Threat Mail) आल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. नुकतंच अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झालाय. त्याअगोदर सलमान खानला देखील मारण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं होतं. या सर्व घटनांमुळे सिनेसृष्टीत मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.

ठरलं तर! विधानसभेत ठाकरेंचा तर विधानपरिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता; बैठकीत निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांनी धमकीच्या ईमेलसंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी मुंबईतील आंबोली पोलिसांनी कलम 351 (3) अन्वये गुन्हा दाखल केलाय. मात्र, या प्रकरणावर कॉमेडियन कपिल शर्माकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांना ईमेलचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानचा असल्याचे आढळून आलं. रिपोर्टनुसार, don99284@gmail.com या ईमेल आयडीवरून धमकीचा संदेश पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने त्याचे नाव विष्णू असल्याचं उघड केलंय. ईमेल पाठवणाऱ्याने दावा केलाय की, तो सर्व सेलिब्रिटींच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. त्यांने या सर्वांना 8 तासांत उत्तर देण्यास सांगितलंय.

“आग लागल्याची ओरड झाली, प्रवाशांनी उड्या मारल्या अन्..”, दादांनी अपघाताचा घटनाक्रम सांगितला

चारही सेलिब्रिटींना पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिलंय, आम्ही तुमच्या अलीकडील हालचालींचे निरीक्षण करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणं महत्त्वाचे आहे. हा सार्वजनिक स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, हा संदेश अतिशय गांभीर्याने घ्या. गोपनीयता राखा. असे करण्यात अयशस्वी झाल्यास धोकादायक परिणाम होऊ शकतो, जो तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम करू शकतात. ईमेलमध्ये पुढे लिहिलंय की, आम्ही पुढील 8 तासांत तुमच्याकडून त्वरित प्रतिसादाची अपेक्षा करतो. आम्हाला प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही असे आम्ही मानू आणि आवश्यक ती कारवाई करू.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube