खळबळजनक! घुसखोर बांगलादेशी महिला झाली ‘लाडकी’; मिळाला योजनेचा लाभ, 5 जण गजाआड
Bangladeshi Woman Gets Benefits Of Ladki Bahin Yojana : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi Woman) ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याची मोहीम महाराष्ट्र पोलीस राबवत आहेत. दरम्यान एक खळबळजनक घटना समोर आलीय. अशाच एका घुसखोर महिलेला चक्क लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळालाय.
मोठी बातमी! वाल्मिक कराडची तब्बेत बिघडली, आयसीयूत दाखल; नेमकं काय घडलं?
मुंबईतील नागपाडा कामाठीपुरा येथून अटक केलेल्या संशयित बांगलादेशी महिला घुसखोरांपैकी एकाने लाडकी बहीण योजनेचा फायदा (Ladki Bahin Yojana Benefits) घेतला. तिच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा झालेले आहेत. अटक केलेल्या बांगलादेशी महिलेने विधानसभा निवडणुकीतही मतदान केल्याचं उघड झालंय.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कामाठीपुरा येथे छापा टाकून दोन पुरुष आणि तीन महिलांसह चार जणांना अटक केली. त्यापैकी एक भारतीय पुरूष आणि तीन महिला आहेत. गुन्हे शाखेने म्हटलंय की, ही महिला बांगलादेशी नागरिक आहे. तिने बांगलादेशी एजंटमार्फत भारतात घुसखोरी केली होती. त्याचं नाव यादव असल्याचं या महिलेनं सांगितलंय. त्याने मुंबईत तिच्या राहण्याची व्यवस्था केली होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजना नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली. या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना आर्थिक लाभ मिळतोय.
ऑटो चालकाचं नशीब फळफळलं! बॉलिवूडमधील ‘हा’ गायक देणार एक लाखांचं बक्षीस
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लाडकी बहीण योजना सुरू झाली होती. त्यामुळे सत्ताधारी अन् विरोधकांत या योजनेवरून आरोप-प्रत्यारोपांची दंगल पाहायला मिळाली. दरम्यान आता या योजनेचा लाभ बांगलादेशी महिलेला मिळाल्यामुळे पुन्हा एकदा या योजनेवरून चर्चा सुरू झालीय. या बांगलादेशी महिलेला कागदपत्रे तयार करण्यासाठी स्थानिक पातळीवरूनच मदत झाली होती. त्याच कागदपत्रांच्या माध्यमातून या महिलेला योजनेचा लाभ मिळाला.
बांगलादेशी घुसखोरांना स्थानिक नागरिकच मदत करत असल्याचं दिसून येतंय. त्यानंतर हे नागरिक देशातील विविध राज्यांत स्थायिक होत असल्याचं चित्र आहे. आता या प्रकरणी काय कारवाई होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.