लाडक्या बहिणींना धक्का, नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता थेट जानेवारीत मिळणार? जाणून घ्या सर्वकाही
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र खात्यात जमा होणार अशी चर्चा सुरुवातीला सुरु होती मात्र आता या हप्त्यांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे या योजनेतील लाखो महिलांना मोठा धक्का बसला आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या महिन्यात देखील लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) बँक खात्यात पैसे जमा होणार नाही. तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, जानेवारी (January) महिन्यात नोव्हेंबर (November) , डिसेंबर (December) आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्र बँक खात्यात जमा होऊ शकतात. याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही मात्र जर जानेवारी महिन्यात तिन्ही हप्त्यांचे पैसे बँक खात्यात जमा झाले तर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात 4500 रुपये मिळू शकतात. माहितीनुसार, राज्य सरकारकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
जानेवारीत खात्यात जमा होणार 4500 रुपये?
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु असल्याने जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्र मिळू शकतात. 21 डिसेंबर रोजी नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असल्याने या डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
केवायसी अनिवार्य
तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेत महिलांना लाभ घ्यायचा असेल तर केवायसी अनिवार्य आहे. राज्य सरकारकडून केवायसीसाठी लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जर 31 डिसेंबरपर्यंत केवायसीची प्रक्रियापूर्ण केली नाही तर जानेवारीपासून या योजनेचा लाभ मिळणार नाही.
