ऑटो चालकाचं नशीब फळफळलं! बॉलिवूडमधील ‘हा’ गायक देणार एक लाखांचं बक्षीस
Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकू हल्ला झाल्यानंतर त्याच्या मदतीसाठी एक रिक्षावाला धावून आला. रात्रीच्या वेळी त्याने सैफला रुग्णालयात पोहोचवले. त्याच्या या मदतीने सैफला रुग्णालयात उपचार घेता आले. ऑटो चालक भजन सिंग राणा याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर खु्द्द सैफ अली खानने त्याची भेट घेतली. त्याचे आभार मानले तसेच भविष्यात पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याला आर्थिक मदतही केली. यानंतर आता मीका सिंहही पुढे आला आहे. त्यानेही भजन सिंग राणाला एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
रुग्णालयात नेणाऱ्या ड्रायव्हरची सैफने घेतली भेट, भेटीनंतर भजन सिंग म्हणाला, सर्वांनीच हात जोडले
भजन सिंग राणा या रिक्षा चालकाने सैफला रुग्णालयात नेले होते. त्यामुळे त्याच्यावर वेळेवर उपचार झाले. यानंतर भजन सिंग यांच्या यांच्या अनेक मुलाखती प्रकाशित होऊन ते प्रसिद्धीच्या झोतात आले. दरम्यान, भजन सिंग राणा आणि सैफ अली खान यांची भेट झाली. या भेटीविषयी बोलताना भजन सिंग यांनी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासमवेत सर्वांनीच हात जोडून आपले आभार मानल्याचं सांगितलं.
सैफने ड्रायव्हरला दिले ५० हजार
घटनेच्या दिवशी सैफ अली खानने रिक्षाचालक भजन सिंग राणाला रिक्षाचे भाडे दिले नव्हते. त्यावेळी परिस्थिती तशी नव्हती. तरी आता त्याने त्याला बक्षीस म्हणून मोठी रक्कम दिल्याचं बोललं जात आहे. असे म्हटले जाते की सैफने भजन सिंगला ५० हजार रुपये दिले आहेत. तसेच आता मीका सिंहही भजन सिंगला एक लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर भजन सिंगचेही नशीब जोरावर आले आहे.
सैफ अली खानवर आणखी एक संकट, सरकार करणार कारवाई, 15 हजार कोटींची संपत्ती होणार जप्त?
मीका सिंहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. मला वाटतं की त्या चालकाला किमान 11 लाख रुपये मिळायला हवेत. कारण त्याने भारताच्या फेवरेट सुपरस्टारला वाचवलं आहे. त्याच्या या कामगिरीचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे. मी स्वतः त्याला एक लाख रुपये देऊ इच्छितो असे मीका सिंह याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता ऑटो ड्रायव्हर भजन सिंग राणा याला प्रत्यक्षात ही मदत केव्हा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सैफबाबत नेमकं काय घडलं होतं?
चोख सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असतानाही अज्ञात मारेकरी 16 जानेवारीला त्याच्या घरात घुसला आणि त्याने सैफवर सपासप वार केले. याच एका विचाराने अनेकांनी हैराण केलं आहे. या भागात सेलिब्रिटी व्यक्ती राहतात. त्यामुळे येथे सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात येथील सुरक्षा व्यवस्था कशी आहे हा संशोधनाचा विषय ठरेल. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला तर या भागात खासगी सुरक्षा व्यवस्थाही आहेच. अभिनेते आणि सेलिब्रिटींनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षेची व्यवस्था केली आहेत. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत.